संप मिटेल, कर्जाचा डोंगर कमी होईल ! निराशेच्या गर्तेत सापडलेल्या एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या - Mumbai Tak - st employee from parbhani ends his life after strike continue more than 3 months - MumbaiTAK
बातम्या

संप मिटेल, कर्जाचा डोंगर कमी होईल ! निराशेच्या गर्तेत सापडलेल्या एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. विलीनकरणाची कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण होणार नसल्याचं लक्षात येताच आणखी एका कर्मचाऱ्याने आपली जीवन संपवलं आहे. परभणीच्या जिंतूर येथील आगारात चालक म्हणून काम करणाऱ्या मुजफ्फर खान यांनी विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. लागोपाठ सुरु असलेला संप, उत्पन्नाचा स्त्रोत कमी झाल्यामुळे कर्जबाजारीपणा आणि वरिष्ठांचा […]

गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. विलीनकरणाची कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण होणार नसल्याचं लक्षात येताच आणखी एका कर्मचाऱ्याने आपली जीवन संपवलं आहे. परभणीच्या जिंतूर येथील आगारात चालक म्हणून काम करणाऱ्या मुजफ्फर खान यांनी विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे.

लागोपाठ सुरु असलेला संप, उत्पन्नाचा स्त्रोत कमी झाल्यामुळे कर्जबाजारीपणा आणि वरिष्ठांचा दबाव अशा बिकट परिस्थितीत अडकलेल्या मुजफ्फर यांनी अखेरीस आत्महत्येचा मार्ग स्विकारला आहे. एसटीचा संप सुरु असताना मुजफ्फर यांना कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूने लागेल याची खात्री होती. परंतू कोर्टाकडून अद्याप यावर कोणताही ठोस निर्णय न आल्यामुळे मुजफ्फर यांची निराशा वाढत गेल्याचं त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं.

भोगाव येथील एका शिवारातील विहीरीत उडी मारुन मुजफ्फर यांनी आपलं आयुष्य आज संपवलं. या घटनेबद्दल कळताच आंदोलकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांनी मुजफ्फर यांचा मृतदेह आंदोलनस्थळी आणण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान आंदोलनकर्ते आणि पोलिसांत झटापटही झाली. यावेळी उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen + eighteen =

अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे? Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त ‘या’ गोष्टी करा फॉलो! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात …म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ कलाकार घेतो सर्वाधिक मानधन? …तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार सिगारेट सोडल्यानंतर शरीरामध्ये होतात ‘हे’ बदल दुधात साखर मिसळून पिता, तर आजच करा बंद …म्हणून हिवाळ्यात आलं खाणं ठरतं फायद्याचं Weight Loss: घरच्या घरी ‘हे’ 7 बेस्ट कार्डिओ वर्कआउट करा! नितळ अन् कोमल त्वचा हवीये? फॉलो करा हा ‘k’ फॉर्म्युला! दररोज ‘ही’ 5 छोटी कामं करून Belly Fat सहज करा कमी! ‘ही’ 5 पानं आहेत दीर्घायुष्याचं वरदान!