Maharashtra Board HSC Result 2021: 12वीच्या निकालाची तारीख जाहीर, रोल नंबर असा करा डाऊनलोड

मुंबई तक

Maharashtra Board HSC Roll Number, MSBSHSE 12th Result 2021: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) 12वीचा निकाल 3 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वाजता ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. बारावीचा निकाल केव्हा जाहीर केला जाणार याबाबत विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून राहिली होती. मात्र आता निकालाची तारीख जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची धाकधूक […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

Maharashtra Board HSC Roll Number, MSBSHSE 12th Result 2021: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) 12वीचा निकाल 3 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वाजता ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. बारावीचा निकाल केव्हा जाहीर केला जाणार याबाबत विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून राहिली होती. मात्र आता निकालाची तारीख जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.

बारावीचा निकाल हा ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. यानुसार त्यांना आपल्या रोल नंबरची गरज असणार आहे. यंदा परीक्षा आयोजित करण्यात आलेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांकडे त्यांचे रोल नंबर नाहीत. म्हणून बोर्डाने विद्यार्थ्यांना रोल नंबर ऑनलाइन जारी केले आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्या 12वी परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर mh-hsc.ac.in करुन आपली माहिती भरुन रोल नंबर डाऊनलोड करु शकतात.

Maharashtra Board 12th Roll Number: असा करा आपला रोल नंबर डाऊनलोड

  • स्‍टेप 1: अधिकृत वेबसाइट mh-hsc.ac.in वर लॉग इन करा.

हे वाचलं का?