इगतपुरीच्या आश्रमशाळेतील 15 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई तक

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक इगतपुरी तालुक्यातील एका आश्रमशाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. शाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरीतील मुंढेगाव येथील आश्रमशाळेतील 15 विद्यार्थअयांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या आश्रमशाळेत तीनशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याला काही दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यानंतर त्याची कोव्हिड चाचणी केली. या कोव्हिड […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक

इगतपुरी तालुक्यातील एका आश्रमशाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. शाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरीतील मुंढेगाव येथील आश्रमशाळेतील 15 विद्यार्थअयांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या आश्रमशाळेत तीनशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याला काही दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यानंतर त्याची कोव्हिड चाचणी केली. या कोव्हिड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर इतरही विद्यार्थ्यांची कोविड चाचणी करण्यात आली.

इंग्लंडहून नागपूरला आलेल्या आई आणि मुलीला कोरोना , जिनोम सिक्वेन्सिंगला पाठवण्यात आले नमुने

या चाचणीत एकूण 15 विद्यार्थ्यांचा कोव्हिड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधित विद्यार्थ्यांना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. आता प्रशासनाकडून आश्रमशाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांसह इतर 340 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शाळेत काम करणारे इतर कर्मचाऱ्यांचीही कोव्हिड चाचणी करण्यात आली आहे.

कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रातून ओसरू लागली आहे. तरीही काही प्रमाणात ओमिक्रॉनचा धोका जाणवू लागला आहे. अशात ओमिक्रॉन संसर्ग झालेले रूग्ण आता बरेही होताना दिसत आहेत तरीही कोरोनाचे आश्रमशाळेत आढळणं ही बाब चिंतेचीच आहे. आवश्यक ती खबरदारी घेतली जाते आहे.

मुंबई-पुण्याला दिलासा! ‘ओमिक्रॉन’ची लागण झालेल्या पहिल्या रुग्णांचा रिपोर्ट ‘निगेटिव्ह’

ओमिक्रॉनशी कसं लढता येईल?

WHO ओ म्हणते की ओमिक्रॉनसह SARS-CoV-2 चे पसरणारे सर्व प्रकार अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अधिक रिसर्चची गरज आहे. शक्य तितक्या, प्रभावित क्षेत्रांची चाचणी करा आणि Omicron चे वर्तन समजून घेण्यासाठी प्रयोगशाळांचे मूल्यांकन करावे. जर हा व्हेरिएंट एखाद्या कम्युनिटमध्ये पसरत असेल तर त्यासाठी कम्युनिटी टेस्टिंग व्हायला हवी.

पीसीआर चाचणीमध्ये, S gene target failure (SGTF) omicron सूचित करू शकते, जेणेकरून नवीन व्हेरिएंट सहज शोधता येईल. कोविड-19 लसीकरण जेवढ्या प्रमाणात वाढवता येईल तेवढी त्याची तीव्रता वाढवा. विशेषतः ज्या लोकांचे लसीकरण झालेले नाही किंवा पूर्ण लसीकरण झालेले नाही अशा लोकसंख्येवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान जोखमीकडे दुर्लक्ष करू नका.

हे वाचलं का?

    follow whatsapp