भयंकर घटना! मित्रासोबत बसस्थानकात बसलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार
राज्यात महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न ज्वलंत बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या थरकाप उडवणाऱ्या घटना घडल्या असून, आणखी एक सामूहिक बलात्काराची घटना नाशिक जिल्ह्यात समोर आली आहे. चार नराधमांनी बसस्थानकात एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत चौघांना बेड्या ठोकल्या. सामूहिक बलात्काराच्या या घटनेनं नाशिक जिल्हा हादरला आहे. या घटनेबद्दल […]
ADVERTISEMENT
राज्यात महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न ज्वलंत बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या थरकाप उडवणाऱ्या घटना घडल्या असून, आणखी एक सामूहिक बलात्काराची घटना नाशिक जिल्ह्यात समोर आली आहे. चार नराधमांनी बसस्थानकात एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत चौघांना बेड्या ठोकल्या.
ADVERTISEMENT
सामूहिक बलात्काराच्या या घटनेनं नाशिक जिल्हा हादरला आहे. या घटनेबद्दल पोलिसांनी माहिती दिली. बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पीडित महिला आणि तिचा मित्र बसस्थानकात बसलेले होते. त्यावेळी चार जण त्यांच्याजवळ आले. त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली.
पुणे : बापच निघाला नराधम; 11 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार
हे वाचलं का?
त्यानंतर त्या चारही नराधमांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर पीडिते पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात चार संशयितांविरोधात सामूहिक बलात्कारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
भयंकर! धावत्या ट्रेनमध्ये तरुणीवर बलात्कार; इगतपुरी-कसारादरम्यान घडली घटना
ADVERTISEMENT
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली आणि या प्रकरणातील चारही संशयितांच्या मुसक्या आवळल्या. काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये एका महिलेवर हातपाय बांधून एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली होती. त्या घटनेची चर्चा थांबत नाही, तोच जिल्ह्यात आणखी एक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT