नागपुरात Corona चा कहर, २४ तासात ५४ रूग्णांचा मृत्यू

मुंबई तक

नागपुरात कोरोनाचा कहरच पाहण्यास मिळतो आहे. मागील २४ तासांमध्ये ५४ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी महिन्यापासून आत्तापर्यंत झालेल्या रूग्ण मृत्यूंमध्ये ही संख्या सर्वाधिक आहे. मागील २४ तासांमध्ये नागपुरात ३ हजार ६८८ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. चोवीस तासांमध्ये १६ हजार ५३५ चाचण्यात करण्यात आल्या आहेत. जे ५४ मृत्यू मागील चोवीस तासात नोंदवले गेले आहेत त्यापैकी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नागपुरात कोरोनाचा कहरच पाहण्यास मिळतो आहे. मागील २४ तासांमध्ये ५४ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी महिन्यापासून आत्तापर्यंत झालेल्या रूग्ण मृत्यूंमध्ये ही संख्या सर्वाधिक आहे. मागील २४ तासांमध्ये नागपुरात ३ हजार ६८८ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. चोवीस तासांमध्ये १६ हजार ५३५ चाचण्यात करण्यात आल्या आहेत. जे ५४ मृत्यू मागील चोवीस तासात नोंदवले गेले आहेत त्यापैकी ३३ मृत्यू शहरी भागात झाले आहेत. तर १७ मृत्यू ग्रामीण भागात झाले आहेत. आत्तापर्यंत नागपूर जिल्ह्यात ३ हजारांपेक्षा जास्त कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्याबाहेर ८४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागण्याची चिन्हं आहेत का?

मुंबई, पुणे व इतर शहरातून नागपुरात आलेल्या नागरिकांनी त्याची माहिती स्थानिक प्रशासन व साथरोग कक्षास फोनद्वारे कळवण्यात यावी असंही आवाहन करण्यात आलं आहे.

नागपुरात लॉकडाऊनही लागू करण्यात आला होता ज्या अंतर्गत काही निर्बंध लादण्यात आले होते. मात्र या निर्बंधांचं पालन नागपूरकरांनी केलं नाही असंच चित्र आहे. त्याचाच फटका आता नागपूरकरांना बसतो आहे. नागपुरात अॅक्टिव्ह रूग्णांची संख्याही पुण्या खालोखाल आहे.

उद्धव ठाकरे म्हणतात, लॉकडाउनचा पर्याय आहे पण…

महाराष्ट्रात कोरोना रूग्ण वाढू लागल्याने रविवार रात्रीपासून जमावबंदी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातल्या काही शहरांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेतच. तरीही महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये त्यामुळे हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

राज्यात फेब्रुवारी महिन्यापासून वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. महत्वाच्या शहरांमधली गर्दी टाळणे, वाढच्या संसर्गाला रोखण्यासाठी कडक उपाययोजना लागू करण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारने रविवारी रात्रीपासून संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्याची आरोग्य व्यवस्था कमी पडेल अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे असं म्हटलं आहे.

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागण्याची चिन्हं आहेत का?

जनतेने आता जर नियम पाळले नाहीत तर येत्या कालावधीमध्ये अधिक कडक निर्बंध लावावे लागतील असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. याचवेळी बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवा असे आदेश दिले आहेत. “लसीकरणाच्या कार्यक्रमात राज्य आज देशात एक नंबरवर असले तरी आणखी प्रभावीपणे हा कार्यक्रम राबवणं गरजेचं आहे. कोरोनाचा नवीन विषाणु आणि औषधोपचार पद्धती यासंबंधीचे मार्गदर्शन टास्क फोर्सच्या सदस्यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला करावे असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp