मुंबईतील 62 Vaccination Centers वर लसी संपल्याने लसीकरण थांबलं
मुंबईतील 62 Vaccination Centres वर लसी संपल्याने लसीकरण थांबवण्यात आलं आहे. मुंबईसह महाराष्ट्राला लसींचा तुटवडा भासतो आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यात 45 वर्षे आणि त्यावरील नागरिकांना लस देण्याची मोहीम सुरू आहे. महाराष्ट्रात सध्या रोज साडेतीन लाख लसी देण्यात येत आहेत. मात्र राज्यात सात लाख लसी रोज देण्याची राज्याची तयारी आहे. संपूर्ण राज्यभरात सुमारे 4 हजार केंद्र […]
ADVERTISEMENT

mumbaitak
मुंबईतील 62 Vaccination Centres वर लसी संपल्याने लसीकरण थांबवण्यात आलं आहे. मुंबईसह महाराष्ट्राला लसींचा तुटवडा भासतो आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यात 45 वर्षे आणि त्यावरील नागरिकांना लस देण्याची मोहीम सुरू आहे. महाराष्ट्रात सध्या रोज साडेतीन लाख लसी देण्यात येत आहेत. मात्र राज्यात सात लाख लसी रोज देण्याची राज्याची तयारी आहे. संपूर्ण राज्यभरात सुमारे 4 हजार केंद्र आहेत. ज्यापैकी अनेक सेंटर्सपर्यंत लसी न पोहचल्याने लसीकरण मोहीम थांबवण्यात आली आहे. मुंबईत 132 लसीकरण केंद्र आहेत त्यापैकी आता 62 ठिकाणी लसींचा स्टॉक संपला आहे. त्यामुळे लसीकरण थांबवण्यात आलं आहे.
1 मे नंतर महाराष्ट्रातल्या 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण शक्य आहे का ?
कुठे कुठे उपलब्ध नाहीत लसी?
बॉम्बे हॉस्पिटल