नवी मुंबईतली धक्कादायक घटना! वायफायचा पासवर्ड दिला नाही म्हणून १७ वर्षांच्या तरूणाची हत्या

मुंबई तक

नवी मुंबईतल्या कामोठे परिसरात एका सतरा वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आली आहे. १७ वर्षांच्या एका मुलाची हत्या वायफायचा पासवर्ड दिला नाही म्हणून करण्यात आली आहे. चाकूने भोसकून या तरूणाची इतर दोघांनी हत्या केली. नवी मुंबईचे झोन १ चे डीसीपी विवेक पानसरे यांनी ही माहिती दिली आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली देताना काय सांगितलं? ज्या मुलाची हत्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नवी मुंबईतल्या कामोठे परिसरात एका सतरा वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आली आहे. १७ वर्षांच्या एका मुलाची हत्या वायफायचा पासवर्ड दिला नाही म्हणून करण्यात आली आहे. चाकूने भोसकून या तरूणाची इतर दोघांनी हत्या केली. नवी मुंबईचे झोन १ चे डीसीपी विवेक पानसरे यांनी ही माहिती दिली आहे.

आरोपींनी गुन्ह्याची कबुली देताना काय सांगितलं?

ज्या मुलाची हत्या करण्यात आली त्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या चौकशीत वायफायचा पासवर्ड न दिल्याने तरूणाची हत्या केल्याचं सांगितलं. आम्ही दोघांनी या मुलाला पासवर्ड देण्याचा आग्रह केला होता. मात्र त्याने तो दिला नाही. त्यानंतर आमचं पासवर्डवरून भांडण झालं. चाकूचे वार आम्ही या तरूणावर केले अशी कबुली या दोघांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आरोपी रवींद्र हरीयानी आणि राज वाल्मिकी हे कामोठे येथील हाऊसिंग सोसायट्यांमध्ये सफाई कामगार म्हणून काम करतात. या दोघांनी एका अल्पवयीन मुलाला इंटरनेट वापरण्यासाठी वायफायचा पासवर्ड मागितला, मात्र त्या मुलाने पासवर्ड शेअर करण्यास नकार दिला. म्हणून या दोन्ही आरोपींनी विशालचा भररस्त्यात खून केला.

कामोठे परिसरातल्या सेक्टर 14 येथील एक अल्पवयीन मुलगा राहात होता. हा मुलगा बेकरी मध्ये काम करतो. सोमवारी रात्री तो रात्री काम आटोपून टपरीवर नेहमीप्रमाणे पान खाण्यासाठी गेला. तिथे आपल्याच ओळखीचे रवींद्र हरीयाणी आणि राज वाल्मिकी उभे होते. त्यांनी आपल्याकडचा मोबाईल डाटा संपला म्हणून १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाकडून इंटरनेट कनेक्टसाठी मोबाईल पासवर्ड मागितला. मात्र तो देण्यास या तरूणाने नकार दिला, यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली.

रागातून दोघांनी अल्पवयीन मुलाला मारहाण केली

याच रागातून दोघांनी आधी त्याला लाथा बुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली. पान टपरीवाल्याने भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी राज याने आपल्या जवळ असलेल्या चाकू अल्पवयीन पाठीत खुपसला आणि तेथून पळ काढला. त्याला रूग्णालयातही नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कामोठे पोलिसांनी दोन्हीही आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. याबाबत उपायुक्त विवेक पानसरे यांनी अधिक माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp