पतीने नवा मोबाईल घेऊन दिला नाही... नैराश्यात गेलेल्या पत्नीने संपवलं आयुष्य!
पतीने नवा मोबाईल फोन घेऊन देण्यास नकार दिल्याने एका 22 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित महिलेने शनिवारी (17 जानेवारी) घरात फाशी घेऊन आत्महत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नव्या मोबाईल फोनसाठी पत्नीची पतीकडे मागणी
पतीने नकार देताच नैराश्यात गेलेल्या पत्नीने संपवलं आयुष्य!
Crime News: गुजरातच्या मोडासा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीने नवा मोबाईल फोन घेऊन देण्यास नकार दिल्याने एका 22 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित महिलेने शनिवारी (17 जानेवारी) घरात फाशी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. सध्या, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.
पतीकडे नव्या मोबाईल फोनची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचं नाव उर्मिला असून ती तिच्या पतीसोबत मिळून चायनीज पदार्थांचा बिझनेस करत होती. सूत्रांच्या माहितीनुसार, पीडितेने काही दिवसांपूर्वीच तिच्या पतीकडे नव्या मोबाईल फोनची मागणी केली होती. मात्र, त्यावेळी पतीने घरात आर्थिक अडचणी असल्याचं कारण सांगून पत्नीला नवा मोबाईल फोन घेऊन देण्यास नकार दिला.
हे ही वाचा: बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध... भावाने प्रियकराला भेटण्याच्या बहाण्याने पार्कमध्ये बोलवलं अन् रक्तरंजित थरार!
फाशी घेऊन महिलेची आत्महत्या
या कारणावरून, पती आणि पत्नीमध्ये मोठा वाद झाला. याच वादाला कंटाळून महिलेने आपल्या घरात फाशी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर, परिसरात एकच खळबळ उडाली आणि महिलेच्या घराबाहेर लोकांची गर्दी जमली. स्थानिक पोलिसांना संबंधित घटनेची माहिती देण्यात आली. प्रकरणाची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. आता, पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा: लग्न होऊन 8 महिने झालं तरीही डॉक्टर असलेल्या प्रियकराला विसरता येईना, शेवटी नवऱ्याचा काटा काढला; भयंकर कट रचला
घटनेचा तपास केला असता, मृत महिला आणि तिचा पती हे मूळ नेपाळचे रहिवासी असून पैसे कमवण्यासाठी गुजरातमध्ये राहत होते. तिथे त्यांना चायनीज पदार्थांचा व्यवसाय सुरू केला होता. सध्या, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून घटनेच्या सर्व बाजूंचा तपासादरम्यान विचार केला जात आहे.










