Rakhi Sawant : राखी सावंतचा पती आदिलवर बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

FIR against Rakhi sawant’s Husband Adil : एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीच्या (rakhi sawant)अडचणीत वाढ होत आहे (adil khan durrani). एकीकडे राखीने आदिलवर मारहाण आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्याच दरम्यान, आदिल खानवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची बातमी समोर आली आहे. इराणमधील एका विद्यार्थीनीने आदिलवर बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आहे.

ADVERTISEMENT

‘मी इस्लाम स्वीकारला, फातिमा बनले’; राखी सावंत लव्ह जिहादबद्दल काय बोलली?

इराणी मुलीने केला गुन्हा दाखल

राखी सावंतचा पती आदिल खान याच्याविरुद्ध म्हैसूरमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. इराणी विद्यार्थिनीने म्हैसूरमधील व्हीव्ही पुरम पोलीस ठाण्यात आदिलविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आदिलविरुद्ध आयपीसीच्या कलम ३७६, ४१७,४२०, ५०४ आणि ५०६ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणमधील एक विद्यार्थी म्हैसूरमध्ये डॉक्टर ऑफ फार्मसीचा अभ्यास करण्यासाठी भारतात आली होती. ती मुलगी डेझर्ट लॅब फूड अड्डा येथे आदिल खानला भेटली. आदिल त्या फूड आउटलेटचा मालक होता. हळूहळू दोघांची जवळीक खूप वाढली होती.

हे वाचलं का?

आदिलवर रेपचा आरोप

तक्रारीनुसार, इराणी विद्यार्थिनीने आदिलवर म्हैसूरमधील एका अपार्टमेंटमध्ये लग्नाचा आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणी तरुणीने 5 महिन्यांपूर्वी आदिलकडे लग्न करण्याची मागणी केली असता, त्याने लग्नास नकार दिला आणि सांगितले की, तिचे तिच्यासारख्या अनेक मुलींसोबत असेच संबंध आहेत.

राखी सावंत विरोधात गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण..

ADVERTISEMENT

मुलीने आदिलला आपण पोलिसात तक्रार करणार असल्याची धमकी दिली तेव्हा त्याने तिला दोन मोबाईल नंबरवरून स्नॅपचॅटवर पीडित मुलीचे काही खासगी फोटो पाठवले. मुलीने तक्रारीत दोन्ही फोन नंबरही नमूद केले आहेत. आदिलने मुलीला धमकी दिली की तो ते छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करेल आणि तिच्या पालकांनाही पाठवेल. तसेच तरुणीने आपल्याविरुद्ध तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

ADVERTISEMENT

राखीने आदिलवर हे आरोप केले आहेत

राखी सावंतनेही आदिलवर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. राखीचा दावा आहे की आदिल तिच्याशी वाईट वागायचा. तिला बेदम मारहाण करायची. आदिलचे इतर अनेक मुलींसोबत अफेअर असल्याचा आरोपही राखीने आदिलवर केला आहे. राखीच्या तक्रारीनंतर आदिलला पोलिसांनी ताब्यात घेतले. आता आदिलवरही बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT