मोठी बातमी: 'कोणीही वाचण्याची शक्यता नाही', 242 जण असलेल्या Air India विमान अपघाताबाबत खळबळ उडवणारी अपडेट
Air India plane Crashes Near Ahmedabad airport in Gujarat: अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. प्राथमिक माहितीनुसार, या विमानात 242 लोक होते. ज्यापैकी एकही प्रवाशी वाचण्याची शक्यता नसल्याची माहिती अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांनी दिली आहे
ADVERTISEMENT

अहमदाबाद: गुजरातमधील अहमदाबादच्या मेघनी नगरमध्ये गुरुवारी (12 जून) दुपारी एक मोठा विमान अपघात झाला. लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान AI-171 अचानक टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच जवळच्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीवर आदळले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, विमान खूप खाली उडत होते आणि थेट पाच मजली इमारतींवर आदळले, ज्यामुळे त्या इमारतींना आग लागली. या अपघातामुळे जवळपासच्या अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या विमानात अपघातात सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानात क्रू मेंबर्ससह एकूण 2402 लोक होते. अपघाताच्या वेळी दुपारी 2 वाजले होते आणि हे ठिकाण सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आहे.
हे ही वाचा>> Air India Plane Crash: अपघात झाला त्या विमानाचे 'ते' 2 पायलट्स नेमके कोण?
'कोणीही वाचण्याची शक्यता नाही', अहमदाबादचे पोलीस आयुक्तांची माहिती
अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी.एस. मलिक यांनी 'आज तक'शी बोलताना विमान अपघाताबद्दल चिंता व्यक्त केली आणि सांगितले की, 'अपघाताची तीव्रता पाहता, कोणीही वाचण्याची शक्यता खूपच कमी दिसते. काही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले होते, परंतु त्यांची प्रकृती खूपच गंभीर होती आणि त्यांना वाचवणे कठीण होत आहे.' आयुक्त मलिक पुढे असेही म्हणाले की, 'बचावकार्य सुरू आहे, परंतु ढिगारा आणि आगीमुळे परिस्थिती खूपच आव्हानात्मक आहे.'
टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन अहमदाबादला रवाना
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन एअर इंडिया विमान अपघातानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अहमदाबादला पोहोचले आहेत. एअर इंडिया ही कंपनी टाटा समूहाचा एक भाग आहे आणि या गंभीर अपघाताच्या पार्श्वभूमीवर, चंद्रशेखरन स्वतः परिस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी आणि आवश्यक सूचना देण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत.