Air India Plane Crash: अपघात झाला त्या विमानाचे 'ते' 2 पायलट्स नेमके कोण?

मुंबई तक

अहमदाबादमध्ये एक भीषण विमान अपघात झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, AI-171 एअर इंडियाचं विमान चालवणारे ते दोन पायलट्स कोण होते? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ADVERTISEMENT

अपघात झाला त्या विमानाचे 'ते' 2 पायलट्स नेमके कोण?
अपघात झाला त्या विमानाचे 'ते' 2 पायलट्स नेमके कोण?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

Air India विमान चालवणारे पायलट्स नेमके कोण?

point

अपघात झाला त्या विमानाचे 'ते' 2 पायलट्स

Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये आज म्हणजेच 12 जून रोजी एक भीषण विमान अपघात झाल्याचं समोर आलं आहे. एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर अवघ्या 5 मिनिटांतच कोसळले. या अपघातग्रस्त विमानात 242 लोक होते आणि यात 230 प्रवासी, 10 क्रू मेंबर्स आणि 2 पायलट होते.

या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विजय रुपाणी यांच्यासह 168 जणांचा समावेश आहे. घटनेनंतर लगेचच बचाव कार्य सुरू झाले. यादरम्यान, AI-171 एअर इंडियाचं विमान चालवणारे ते दोन पायलट्स कोण होते? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

फ्लाइटचे पायलट्स नेमके कोण?

या विमानात कॅप्टन सुमित सभरवाल आणि क्लाईव्ह कुंदर असे दोन पायलट्स होते. या विमानाची कमांड कॅप्टन सुमित सभरवाल यांच्याकडे होती आणि क्लाईव्ह कुंदर हे या उड्डाणाचे फर्स्ट ऑफिसर म्हणजेच पहिले अधिकारी होते.

कोण आहेत कॅप्टन सुमीत सभरवाल?

कॅप्टन सुमित सभरवाल हे एक अनुभवी पायलट आहेत. त्यांना एलटीसी (लायसन्स टू कमांड) अंतर्गत 200 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. ते या फ्लाइटचे मुख्य पायलट होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp