15 वर्षीय मुलीचा मौलानाकडून लैंगिक छळ, लाज आणणारा प्रकार

मुंबई तक

crime news : एका मौलानाने 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलाय. एफआरआय दाखल केल्यानंतर आठ तासांनंतर मौलाना अटक झालाय.

ADVERTISEMENT

crime news
crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मौलानाकडून 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

point

लैंगिक छळाबाबतचा प्रश्न आता ऐरणीवर

Crime News : एका मौलानाने 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलाय. संबंधित प्रकरणात पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी उशिरा रात्री घनश्यामपुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. एफआरआय दाखल केल्यानंतर आठ तासांनंतर मौलाना जैनुल आबेदीनला अलीगर ठाणे क्षेत्रातील पाकाडी गावातून अटक केली. या प्रकरणी मौलनावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना बिहारच्या दरभंगा येथील आहे. 

हे ही वाचा : महिलेनं मुलीसह बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, जंगलात मृतदेह जाळून पुरला

नराधम मौलानाला अटक 

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीला पाकाडी गावातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार, पीडितेची मेडिकल तपासणी करण्यात आली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपींची चौकशी करण्यात आली असून तपास सुरू आहे. संबंधित प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी हा झैनुल अबेदीन, जो बिरोल पोलीस ठाणे परिसरातील रुपनगरचा रहिवासी आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. 

हे ही वाचा : 'तू माझ्या बायकोशी का बोलतोस,' म्हणत नवऱ्याने तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवलं

लैंगिक छळाबाबतचा प्रश्न आता ऐरणीवर

दरम्यान, मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनेत वाढ होऊ लागल्याचं चित्र आहे. यावरून लहान मुलांच्या लैंगिक छळाबाबतचा प्रश्न आता ऐरणीवर येताना दिसतोय. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. मौलानाने केलेल्या घृणास्पद कृत्याने नागरिक चांगलेच संतापून गेलेत.