महिलेनं मुलीसह बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, जंगलात मृतदेह जाळून पुरला

मुंबई तक

Crime News : एका महिलेनं आपल्या मुलीसह तिच्या प्रियकराच्या मदतीने दोघांनी मिळून पतीची हत्या केली. वडिलांना नशेचे पदार्थ पाजून दगडाने ठेचून ठार केलं. हत्येनंतर मृतदेह जंगलात नेत जाळून टाकला. तसेच उरलेली राख जंगलातच पुरली. दरम्यान पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून तक्रार करण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

आईसह मुलीनं तिच्या बॉयफ्रेंडच्या मदतीने वडिलांना संपवलं

point

प्रियकराच्या नातेसंबंधावर प्रश्न

Crime News : एका महिलेनं आपल्या मुलीसह तिच्या प्रियकराच्या मदतीने दोघांनी मिळून पतीची हत्या केली. वडिलांना नशेचे पदार्थ पाजून दगडाने ठेचून ठार केलं. हत्येनंतर मृतदेह जंगलात नेत जाळून टाकला. तसेच उरलेली राख जंगलातच पुरली. दरम्यान पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून तक्रार करण्यात येत आहे. दरम्यान, मृतदेहाचे काही भाग अद्याप सापडलेले नाहीत. ही घटना उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील आहे.

हे ही वाचा :  'तू माझ्या बायकोशी का बोलतोस,' म्हणत नवऱ्याने तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवलं

आईसह मुलीनं तिच्या बॉयफ्रेंडच्या मदतीने वडिलांना संपवलं

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, महिलेनं आपली मुलगी आणि मुलीच्या बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला नशेचे पदार्थ देऊन दगडाने ठेचून ठार केलं. त्यांनी सांगितलं की आरोपीने यमुना नदीच्या किनाऱ्यावरील एका जंगलात मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. मागील तीन दिवसांपासून तपास सुरू असून पोलिसांना अद्यापही मृतदेह आढळून आलेला नाही. वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्लोक कुमार यांनी सांगितलं की, तीन आरोपींची चौकशी सुरू असून गुरूवारी रात्री मृतदेहाचा तपास केला. 

संबंधित प्रकरणात रामबाबू नावाच्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत लिहिलं की, छोटा भाऊ मनोज सोनी (वय 42) हिची हत्या पत्नी नैना (वय 40) आणि त्यांची लहान मुलगी भक्ती यांनी मिळून भावाला मारल्याचा आरोप केला. भक्तिचा कथित प्रियकर विमल चौधरी (वय 22) यांनी मिळून केली. 

प्रियकराच्या नातेसंबंधावर प्रश्न 

तक्रारीच्या आधारे, मनोजने आपल्या मुलीला एका कथित तरुणासोबत पाहिले होते. यामुळे मुलीच्या आणि तिच्या प्रियकराच्या नातेसंबंधावर प्रश्न निर्माण होऊ लागला होता. यानंतर त्याने आपल्या बायकोशी वाद घातला आणि तो घर सोडून निघून गेला. पोलिसांनी सांगितलं की, मनोज 18 एप्रिल रोजी बेपत्ता झाला असता, नैनाने 21 एप्रिल रोजी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. दुसऱ्या दिवशी विनाकारण तक्रार मागे घेतली. नंतर तीन आठवड्यानंतर मनोजबाबत कोणतीही माहिती न समजल्याने त्याचा मोठा भाऊ राम बाबूने 9 मे रोजी बेपत्ता असल्याची तक्रार केली.