दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलावर बलात्कार, भाजी विक्रेता फरार
राजस्थानमधील एका भाजी विक्रेत्याने त्याच्या दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण केलं आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलावर बलात्कार
भाजी विक्रेता फरार
Crime News : एका अल्पवयीन मुलावर झालेल्या गंभीर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. एका भाजी विक्रेत्याने आपल्या दुकानात मजुरीचे काम करणाऱ्या एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलावर गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून सतत लैंगिक अत्याचार आणि शोषण केल्याचा आरोप आहे. या सततच्या त्रासामुळे हा अल्पवयीन मुलगा मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेला होता. राजस्थानमधील बाडोमेर जिल्ह्यातील ही घटना आहे.
कुटुंबाला सांगितला सगळा प्रकार
आरोपीच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलाने धाडस दाखवून घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला. ही हकीकत ऐकून हादरलेल्या पालकांनी अत्यंत गांभीर्याने पावले उचलत मुलाला सोबत घेऊन पोलीस ठाणे गाठले. पालकांनी 7 ऑगस्ट रोजी सदर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरोधात तत्काळ गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे.
हे ही वाचा : सावत्र बापाने 14 वर्षीय मुलीवर केला बलात्कार, गरोदर राहिल्यानंतर प्रकरणाचा उलगडा
पुराव्यांची सखोल तपासणी
बाडोमेरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितेश आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगा आरोपीच्या भाजीच्या दुकानात कामाला होता आणि याच दरम्यान दुकादाराने त्याचे शोषण केले. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी केली आहे, तसेच तपास अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. या गुन्ह्याचा तपास महिला सेलच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडे सोपवण्यात आला असून पोलीस सर्व पुराव्यांची सखोल तपासणी करत आहेत.
हे ही वाचा : फॉर्च्युनरचा वेग 150, मिसिंग लिंकमध्ये अपघात कसा झाला? पोलिसांनी सांगितलं...
आरोपी कुठे लपला?
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलीस सध्या फरार आरोपीचा शोध घेत असून त्याला लवकरात लवकर अटक केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. अल्पवयीन मुलाचा जबाब आणि वैद्यकीय तपासणीच्या अहवालानुसार या प्रकरणात पुढील कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
