'तू माझ्या बायकोशी का बोलतोस,' म्हणत नवऱ्याने तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवलं

मुंबई तक

crime news : एक व्यक्ती महिलेसोबत सातत्याने फोन करून बोलायचा. यामुळे महिलेच्या नवऱ्याला फोन करणाऱ्या तरुणावर अवैध संबंधाचा संशय होता. याच रागातून आरोपी नवऱ्याने संबंधित तरुणावर लाकडी फळीने हल्ला केला, नंतर काठीने मारहाण करत संपवलं. या हल्ल्यात पीडित तरुण रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता.

ADVERTISEMENT

crime news
crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

तरुण पत्नीशी बोलतो असा नवऱ्याला संशय 

point

आरोपींनी तरुणाला संपवलं

Crime News : एक व्यक्ती महिलेसोबत सातत्याने फोन करून बोलायचा. यामुळे महिलेच्या नवऱ्याला फोन करणाऱ्या तरुणावर अवैध संबंधाचा संशय होता. याच रागातून आरोपी नवऱ्याने संबंधित तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला केला, नंतर काठीने मारहाण करत संपवलं. या हल्ल्यात पीडित तरुण रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. ही घटना मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील उदयपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे ही वाचा : Astrology : वर्षातील दुसरे सूर्यग्रहण ऑगस्टमध्ये होणार, 'या' राशींच्या अडचणी वाढणार

रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह

हत्या करण्यात आलेल्या तरुणाची जुगल किशोर रघुवंशी अशी ओळख समोर आली. 4 ऑगस्ट रोजी सकाळी उदयपुरा ठाणे क्षेत्राच्या ग्राम सौजनी रोडवर खळबळजनक घटना घडली होती. स्थानिक लोकांना जुगल किशोर रघुवंशीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं होतं. त्याच्या शरीरावर आणि मानेवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता, तिथे मोठी जखम झाली होती. 

या घटनेची माहिती मिळताच, उदयपुरा पोलीस ठाणे पथकात तात्काळपणे घटनास्थळी दाखल होत निरीक्षण करण्यात आले. प्राथमिकदृष्ट्या हत्येचे प्रकरण समोर आले असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलमांन्वये 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

आरोपींची ओळख पटली

या प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळाजवळील राहणाऱ्या लोकांसोबत चौकशी केली. मृताच्या संभाव्य मार्गांविषयी व ओळखीच्या व्यक्तींविषयी माहिती गोळा केली. याव्यतिरिक्त, उदयपुरा ते घटनास्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षींच्या आधारे केलेल्या या तपासामुळे, पोलिसांचा तपास सौजानी गावातील रहिवासी असलेल्या अरविंद मेहरा आणि दीपक मेहरा या दोन भावांपर्यंत पोहोचला होता.