Aparna Mahadik: अपघात झाला त्याच Air India विमानात होत्या सुनील तटकरेंच्या नातेवाईक, अपर्णा महाडिक कोण आहेत?

मुंबई तक

एअर इंडियाच्या ज्या AI171 विमानाचा अपघात झाला त्यामध्ये क्रू मेंबर म्हणून अपर्णा महाडिक या प्रवास करत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या नातेवाईक आहेत.

ADVERTISEMENT

अपर्णा महाडिक कोण आहेत?
अपर्णा महाडिक कोण आहेत?
social share
google news

अहमदाबाद: गुजरातमधील अहमदाबादच्या मेघानी नगरमध्ये गुरुवारी (12 जून) एक भीषण विमान अपघात झाला. याच विमानात सीनियर क्रू मेंबर म्हणून अपर्णा महाडिक या कार्यरत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुनील तटकरे यांच्या नातेवाईक आहेत. 

कोण आहेत अपर्णा महाडिक?

अपर्णा महाडिक या एअर इंडिया फ्लाइट AI171 मधील वरिष्ठ केबिन क्रू मेंबर आहेत. ज्या 12 जून 2025 रोजी अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या विमानात होत्या. अहमदाबादहून टेक ऑफ घेतल्यानंतर काही मिनिटांतच या विमानाचा अपघात झाला. ज्यामध्ये तब्बल 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

दरम्यान, याच विमानात क्रू मेंबर असलेल्या अपर्णा महाडिक या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) खासदार सुनील तटकरे यांच्या भाच्याच्या पत्नी, म्हणजेच अमोल महाडिक यांच्या पत्नी आहेत. 

अपर्णा महाडिक या सुनील तटकरेंचे भाचे अमोल यांची पत्नी आहेत. अमोल हे स्वतः एअर इंडियामध्ये पायलट आहेत. काही तासांपूर्वी ते दिल्लीत लँड झाले. दरम्यान, या अपघाताचं वृत्त समजताच ते अहमदाबादला रवाना झाले आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp