Vijay Rupani: 2024 साली देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यात विजय रुपाणींनी बजावलेली मोलाची भूमिका
Vijay Rupani Death: गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे अहमदाबाद विमान अपघातात निधन झाल्याच्या वृत्ताला आता पुष्टी मिळाली आहे. रुपाणी हे त्यांच्या पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते.
ADVERTISEMENT

अहमदाबाद: अहमदाबाद विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या दुःखद अपघातात 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. याच अपघातग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील होते. ज्यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याचं आता समोर आलं आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताबाबत गुजरात भाजप अध्यक्ष सीआर पाटील यांनी पुष्टी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय रुपाणी हे त्यांच्या पत्नी अंजली आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते. आतापर्यंत या अपघातात 204 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, 41 जखमींवर उपचार सुरू आहेत.
गुजरात भाजप अध्यक्ष सीआर पाटील यांनी तीव्र शोक व्यक्त केला आणि सांगितले की, 'या अपघातात विमानातील प्रवाशांसह, वसतिगृहात राहणाऱ्या डॉक्टर विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील गुजरातला पोहोचले आहेत आणि परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. भाजप परिवारालाही या घटनेचे खूप दुःख आहे.'
हे ही वाचा>> धक्कादायक.. विजय रुपाणी चाललेले पत्नी आणि मुलीला भेटायला, पण.. माजी मुख्यमंत्र्यांचा दुर्दैवी मृत्यू
यासोबतच त्यांनी माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि सर्व दिवंगत आत्म्यांना शांती मिळावी अशी प्रार्थना केली. या कठीण काळात शोकाकुल कुटुंबाला धीर आणि धैर्य मिळावे अशीही त्यांनी प्रार्थना केली.
दुसरीकडे, विमान अपघाताची बातमी मिळताच विजय रुपाणी यांच्या शेजाऱ्यांनी ते सुखरूप असावे यासाठी पूजा-अर्चाही सुरु केली होती. मात्र, आता त्यांच्या निधनाचं वृत्त समोर आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.