राज्यात सामूहिक राष्ट्रगीताला उत्स्फूर्त प्रतिसाद; कुठं अंतयात्रा थांबवून तर कुठं शेतात उभं राहून राष्ट्रगीत सादर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र सरकारकडून 17 ऑगस्ट रोजी ठीक 11 वाजता राष्ट्रगीत म्हणण्याचे आदेश काढण्यात आले होते. संपूर्ण महाराष्ट्रात एकाचवेळी जो जिथे आहे तिथे उभारून राष्ट्रगीत म्हणावे, असे आवाहन करण्यात आले होते. देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबविले जात आहे.

ADVERTISEMENT

‘स्वराज्य महोत्सवअंतर्गत’ सामूहिक राष्ट्रगीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा लावण्यास सांगितले होते. मोठ्या उत्साहात देशभरात घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबवण्यात आला. त्यानंतर आता राज्य सरकारकडून स्वराज्य महोत्सवानिमित्त सामूहिक राष्ट्रगीताचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला राज्यभर प्रतिसाद मिळाला. अनेक शहरांमध्ये 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्यात आले.

हे वाचलं का?

शेतात उभं राहून शेतकऱ्यांनी गायलं राष्ट्रगीत

नागपूर जिल्ह्यातील कोरडी येथे महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत म्हणण्यात आले. अमरावती येथे खासदार नवनीत रवी राणा यांनी आपल्या गंगा सावित्री निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांसह सामूहिक राष्ट्रगीत गायलं. तर यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात शेतात उभं राहून शेतकऱ्यांनी राष्ट्रगीत सादर केले. सांगली जिल्ह्यात देखील नागरिकांनी मोठ्या संख्येत ठीक 11 वाजता उभारून सामूहिक राष्ट्रगीत गेले गेले. सांगली महापालिकासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, मार्केट येथे नागरिकांनी राष्ट्रगीत म्हणत देशप्रेम जागवलं.

ADVERTISEMENT

तसेच कोल्हापूर येथे श्री करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिर परिसरात भक्तगण व नागरिकांच्यावतीनं सामूहिक राष्ट्रगीत संपन्न झालं. जिल्हाधिकारी कार्यालय इथं खासदार धैर्यशील माने तसंच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थित कर्मचाऱ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत गायलं. बारामतीत देखील नागरिकांनी शाळेत, कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी हातात तिरंगा घेत सामूहिक राष्ट्रगीत सादर केले.

ADVERTISEMENT

अंतयात्रा थांबवत नातेवाईकांनी राष्ट्रगीत गायले

वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे बाहेती कुटुंबातील 78 वर्षीय व्यक्तीचे निधन झाले होते. यादरम्यान शहरातून अंतयात्रा काढण्यात आली असताना राष्ट्रगीतासाठी देण्यात आलेली वेळ झाली. याची कल्पना येताच नातेवाईकांनी प्रेत खाली ठेवत राष्ट्रगीत सादर केले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT