मोबाईल चार्जिंगवरुन झालेल्या वादात तरुणाची हत्या, तीन मित्रांना अटक
अनेकदा क्षुल्लक कारणांवरुन झालेल्या वादामुळे काहींचा जीव गमावल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. ठाणे शहरात एका तरुणाला मोबाईल चार्जिंग करण्यावरुन झालेल्या वादात आपला जीव गमवावा लागला आहे. सुमीत राऊत असं या तरुणाचं नाव असून त्याच्या मित्रांनीच त्याच्यावर हल्ला केल्याचं समोर आलंय. मिळालेल्या माहितीवरुन लोकमान्य नगर भागात राहणाऱ्या साहील आणि अभिषेक या दोन तरुणांमध्ये मोबाईल चार्जिंग करण्याच्या […]
ADVERTISEMENT
अनेकदा क्षुल्लक कारणांवरुन झालेल्या वादामुळे काहींचा जीव गमावल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. ठाणे शहरात एका तरुणाला मोबाईल चार्जिंग करण्यावरुन झालेल्या वादात आपला जीव गमवावा लागला आहे. सुमीत राऊत असं या तरुणाचं नाव असून त्याच्या मित्रांनीच त्याच्यावर हल्ला केल्याचं समोर आलंय.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीवरुन लोकमान्य नगर भागात राहणाऱ्या साहील आणि अभिषेक या दोन तरुणांमध्ये मोबाईल चार्जिंग करण्याच्या कारणावरुन जोरदार वाद झाला. अभिषेक आणि साहिलचा वाद नेमका कोणत्या कारणावरुन झाला हे जाणून घेण्यासाठी सुमीत राऊत तिकडे गेला असता रागाच्या भरात असलेल्या साहील आणि अभिषेकने सुमीतवर धारदार शस्त्राने वार केले. ज्यात सुमीतचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
नागपुरात थरकाप उडवणारी घटना! बेपत्ता २३ वर्षीय तरुणीची जाळून हत्या
हे वाचलं का?
वर्तकनगर पोलीस ठाण्यात या घटनेबद्दल गुन्ह्याची नोंद झाली असून पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे. यातील दोन आरोपी अद्याप फरार असल्याचं कळतंय.
Pune Crime : तडीपार गुंडाची दादागिरी, घरात शिरुन २१ वर्षीय तरुणीचा विनयभंग
ADVERTISEMENT
दरम्यान गुन्हा दाखल झालेले आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचं कलतंय. हा प्रकार समोर येताच मयत सुमीत राऊतच्या नातेवाईकांनी आरोपीला फाशीची शिक्षा द्या नाहीतर आमच्या ताब्यात द्या. आम्ही आमच्या मुलाच्या हत्येचा बदला घेऊ अशी मागणी केली आहे. वर्तक नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT