मोदी सरकार विरुद्ध युवा सेनाप्रमुख : आदित्य ठाकरेंच्या काळातील कामाचं केंद्राकडून ‘ऑडिट’

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात राजकीय संघर्ष सुरू असतानाच महत्त्वाची माहिती समोर आलीये. माजी पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांचं केंद्र सरकारकडून ऑडिट केलं जाणार आहे. यात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाशी संबंधित कामं ऑडिटच्या केंद्रस्थानी असणार आहेत.

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केली. शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं आणि राज्यात सत्तांतर झालं. मात्र, आता शिवसेना ताब्यात घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाबरोबरच शिवसेनेचा वाद आता केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंतही पोहोचला आहे.

दुसरीकडे तब्बल ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आधी निष्ठा यात्रा आणि त्यानंतर शिव संवाद यात्रा सुरु केली आहे. आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रेच्या माध्यमातून बंडखोर आमदारांविरोधात मोर्चा उघडला आहे. असं असतानाच आता केंद्र सरकारने तत्कालिन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडील खात्याच्या गेल्या अडीच वर्षातील कामाचे ऑडिट सुरू केलं आहे. यात विशेषतः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभार केंद्रस्थानी ठेवण्यात आला आहे.

हे वाचलं का?

‘आदित्य ठाकरेंच्या सभेला गर्दी पाहिली का?’ म्हणताच बंडखोर आमदार भूमरे शिवसैनिकांवर चिडले, म्हणाले…

आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रा सुरु केली असून, यात्रेचा पहिला टप्पा पार पडला आहे. शिव संवाद यात्रेच्या निमित्ताने शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जात आदित्य ठाकरे हे शिवसेनेची बाजू पटवून देताना दिसत आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला मिळत असलेला प्रतिसाद बघून शिवसेना पुन्हा भरारी घेईल, असा अशी शक्यता शिवसैनिकांसह राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. त्यातच आता केंद्राने ऑडिट सुरू केल्यानं याचे वेगवेगळे राजकीय अर्थ लावले जाऊ लागले आहेत.

ADVERTISEMENT

मोदी सरकार पहिल्या टप्प्यात कुठे ऑडिट करणार?

महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळाच्या कारभाराबाबत केंद्राने मुंबईतील मुख्यालयापासून पुणे, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, रायगड आदी विभागांतील कार्यालयात केंद्र सरकारने ऑडिट सुरू केलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मुख्यालयाबरोबर नागपूर कार्यालयाचा समावेश आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर विभागीय कार्यालयांचंही ऑडिट करण्याबाबत खातेप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

शिवसेनेतल्या बंडानंतर राज ठाकरेंच्या निशाण्यावर रश्मी ठाकरे?, काय म्हणाले राज?

बंडखोर आमदारांकडून आदित्य ठाकरेंवरही टीका

बंडखोरी केल्यानंतर सुरुवातीला शिंदे गटातील आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीका न करण्याची भूमिका घेतली होती. सरकार स्थापन होईपर्यंत ठाकरे कुटुंबावर टीका न करण्याची आमदारांची भूमिका आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रा आणि शिव संवाद यात्रेनंतर बदलताना दिसत आहे.

आदित्य ठाकरे यांच्या यात्रेला सुरुवात झाल्यानंतर सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरेंना निधी आणि हिंदुत्वावरून उलट सवाल केले. कांदे यांनी थेट उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. त्याचबरोबर तर शंभूराज देसाईंनीही उद्धव ठाकरेंवरील कांदे यांच्या आरोपाला दुजोरा दिला. दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरही आदित्य ठाकरेंवर टीका करू लागले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT