संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले…’आप आये बहार आयी..’
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आज निलंबित खासदारांच्या आंदोलनाला भेट दिली. त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत हे त्या ठिकाणी होते. राहुल गांधी आल्याचं बघताच आप आये बहार आयी असं संजय राऊत यांनी म्हटलं. त्यांचा तो क्षण कॅमेरात कैद झाला आहे. राज्यसभेच्या 12 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांनी संसदेतील महात्मा गांधी […]
ADVERTISEMENT

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आज निलंबित खासदारांच्या आंदोलनाला भेट दिली. त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत हे त्या ठिकाणी होते. राहुल गांधी आल्याचं बघताच आप आये बहार आयी असं संजय राऊत यांनी म्हटलं. त्यांचा तो क्षण कॅमेरात कैद झाला आहे. राज्यसभेच्या 12 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांनी संसदेतील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाला भेट देण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आले होते.

काय घडलं?
राहुल गांधी हे जेव्हा बारा निलंबित खासदारांच्या आंदोलन स्थळी आले त्यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांचं स्वागत केलं. तसंच ते खासदारांजवळ त्यांना घेऊन जात असतानाच आप आये बहार आयी हे शब्द उच्चारले. या संबंधीचा व्हीडिओ ट्विटरवर चांगलाच व्हायरल झाला आहे.
