आमिर-खान किरण राव यांनी Divorce ची घोषणा केल्यानंतर का ट्रोल होते आहे फातिमा सना शेख?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव यांनी शनिवारी घटस्फोट घेतल्याची घोषणा केली. त्यानंतर सिनेविश्वात एकच खळबळ उडाली. अनेकांसाठी हा धक्काच होता. आमिर असा काही निर्णय घेईल असं वाटलं नव्हतं. मात्र या दोघांनीही एक जॉईंट स्टेटमेंट काढून विभक्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. आमिर आणि किरण राव हे गेल्या पंधरा वर्षांपासून एकत्र होते. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांनी त्यांच्या लग्नाचा पंधरावा वाढदिवसही साजरा केला. मात्र अचानक त्यांनीही घोषणा केली ज्यानंतर आणखी एक गोष्ट घडली. सोशल मीडियावर अभिनेत्री फातिमा सना शेख चांगलीच ट्रोल होऊ लागली. आमिरखान किरण राव डिव्होर्सचा हॅशटॅग चालवत अनेक नेटकऱ्यांनी फातिमा सना शेखला ट्रोल केलं आहे.

ADVERTISEMENT

का झालं नेमकं असं?

घटस्फोट घेत असल्याची घोषणा आमिर खान आणि किरण राव या दोघांनी एकत्र निवेदन काढून केली आणि ट्रोल झाली दंगलफेम गीता म्हणजेच फातिमा सना शेख. असं घडलं का तर यामागे एक मुख्य कारण आहे ते कारण हे आहे की गेल्या अनेक दिवसांपासून अशी चर्चा होती की आमिर खान आणि किरण राव यांचं नातं संपुष्टात येण्याचं कारण कुठेतरी फातिमा सना शेख आहे. दंगलच्या सेटवर आमिर खान आणि फातिमा सना शेख यांचे सूर जुळले. किरण रावला ही गोष्ट खटकली. आता यामध्ये कितपत तथ्य आहे ते आमिर, फातिमा आणि देवालाच ठाऊक. मात्र नेटकऱ्यांना एवढंसं कारणही कुणालाही ट्रोल करायला पुरतं आणि तेच झालं. अनपेक्षित अशी आमिर खान आणि किरण रावच्या डिव्होर्सची घोषणा झाली आणि फातिमा सना शेखला लोकांनी ट्रोल करण्यास सुरूवात केली.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे नेटकऱ्यांनी ?

अनेक नेटकऱ्यांनी हा दावा केला आहे की आमिर खानचं पुढचं टार्गेट फातिमा सना शेख असणार आहे. इथे टार्गेटचा अर्थ थोडासा घेताना नेटकऱ्यांनी टारगटपणा केला आहे. फातिमा सना शेख ही आमिर खानची तिसरी पत्नी असेल असं नेटकऱ्यांना यातून म्हणायचं आहे. अनेका नेटकऱ्यांनी आमिर खान आणि रिना (आमिरची पहिली बायको) आमिर खान आणि किरण राव (आमिरची दुसरी बायको) ही दोन्ही लग्न आणि घटस्फोट हे बहुचर्चित लव्ह जिहादशी जोडले आहेत. ते लव्ह जिहादशी जोडत असतानाही अनेकांनी फातिमा सना शेख ही आता आमिर खानची तिसरी पत्नी असू शकते अशी शक्यता वर्तवत तिला तुफान ट्रोल केलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

आमिर खान आणि फातिमा सना शेख हे दोघेही दोन सिनेमांमध्ये एकत्र झळकले आहेत. पहिला सिनेमा होता दंगल. त्यामध्ये महावीर सिंग फोगाट ही व्यक्तिरेखा आमिरने साकारली होती. तर फातिमा सना शेखने यामध्ये गीता फोगाटचा रोल केला होता. या सिनेमामध्ये आमिर खान आणि फातिमा सना शेख यांचं सूत जुळलं अशा चर्चा झाल्या होत्या. त्यामुळेच फातिमा सना शेखला ठग्ज ऑफ हिंदोस्तान हा सिनेमा मिळाला. आमिर खान, अमिताभ बच्चन, कतरिना कैफ आणि फातिमा सना शेख अशी तगडी स्टार कास्ट असलेला सिनेमा बॉक्स ऑफिसवर इतक्या जोरात आपटला की त्याची कल्पनाही आमिरने किंवा बिग बी अमिताभ बच्चन यांनी केली नसावी. पण हा सिनेमा फातिमाला आमिर खानमुळे मिळाला अशीही चर्चा त्यावेळी रंगली होती.

फातिमा सना शेखने या सगळ्या चर्चेवर काय म्हटलं आहे?

‘ठग्ज….’च्या वेळी जेव्हा या दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली होती तेव्हा फातिमा सना शेखचं वक्तव्य समोर आलं होतं. ‘मला आधी या सगळ्या गोष्टींमुळे त्रास व्हायचा फरक पडायचा की लोक असं कसं काय बोलू शकतात? मात्र आता मला या गोष्टींचं काहीही वाटत नाही. मी ज्यांना ओळखतही नाही असे लोक माझ्या विरोधात बोलत असतील आणि मला ट्रोल करत असतील तर मी त्यांना का महत्त्व देऊ?’ असं वक्तव्य 2019 मध्ये फातिमा सना शेखने केलं होतं. काल झालेल्या ट्रोलिंगबाबत मात्र फातिमा सना शेखने काहीही वक्तव्य केलेलं नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT