अभिनेत्री कंगना रणौतला ठार मारण्याची धमकी, कंगनाची पोलिसात धाव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावरून ही धमकी देण्यात आली आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कंगना रणौत कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळेही तिच्यावर टीका झाली. सोशल मीडियावर आपल्याला जीवे मारण्याची धमकी आल्याचं आता कंगनाने म्हटलं आहे. तिने याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

ADVERTISEMENT

काय म्हटलं आहे कंगनाने?

हे वाचलं का?

कंगनाने पोलिसांना सांगितलं की तिला सोशल मीडियावरून एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर कंगनाने मनाली येथील पोलीस स्टेशन गाठलं त्या ठिकाणी धमकी देणाऱ्याविरोधात फिर्याद दिली. याबाबत कुलू-मनालीचे पोलीस अधीक्षक गुरूदेव शर्मा यांनी माहिती देताना सांगितलं की कंगनाने रणौतने मनाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ज्यामध्ये तिने लिहिलं आहे की सोशल मीडियावर एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी कलम 295 A, 504, 505, 506, 509 अंतर्गत आयपीसी प्रकरण प्रविष्ट केलं आहे.

शीख समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून कंगना रणौतच्या अडचणीत वाढ झालीय. आम आदमी पक्षाचे आमदार आणि दिल्ली विधानसभेच्या शांतता आणि सद्भावना समितीचे अध्यक्ष राघव चड्डा यांनी कंगनाला समन्स पाठवलं आहे. त्यामुळे या प्रकरणात कंगनाला 6 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता समितीसमोर हजर राहावे लागणार आहे. कंगनावर शिख समुदायाविरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

ADVERTISEMENT

कंगना रणौत विरोधात पुण्यातल्या चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

ADVERTISEMENT

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अनेकदा काही वक्तव्यं करुन कंगनाने वाद ओढावून घेतल्याचं आतापर्यंत आपण पाहिलं आहे. काही दिवसांपूर्वीही कंगनाने एक अशाच पद्धतीचं अत्यंत वादग्रस्त विधान केलं आहे. ज्यावरुन सोशल मीडियावर तिच्याविरोधात टीकेची झोड उठली आहे. कंगनाने एका कार्यक्रमात असं वक्तव्य केलं आहे की, ‘1947 साली जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य नव्हतं तर ती भीक होती. खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं आहे.’ असं वक्तव्य कंगनाने केलं. ज्यानंतर आता कंगनावर टीका होताना दिसते आहे. एवढंच नाही तर तिच्याविरोधात मुंबई आणि पुण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT