कोरोनामुक्त झाल्यानंतर अभिनेत्री प्रिया बापटने पहिल्यांदाच केलं ‘हे’ मोठं काम

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. अनेक मराठी कलाकार देखील कोरोनाच्या विळख्यात अडकून बरे झालेत. तर अभिनेत्री प्रिया बापट आणि तिचा पती उमेश कामत याने देखील कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. तर आता प्रियाने कोरोनातून बरं झाल्यानंतर मोठं काम केलं आहे.

प्रिया बापटने सोशल मीडियावरून फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये ती रक्तदान करताना दिसतेय. प्रियाची ही पोस्ट फार चर्चेत आहे कारण आयुष्यात जे आजवर जमलं नाही ते कोरोनातून बरं झाल्यानंतर केलं असल्याचं तिचं म्हणणं आहे. तिच्यासोबत उमेशने देखील रक्तदान केलं आहे.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये प्रिया म्हणते, हे माझं पहिलं रक्तदान आहे. हो, मला माहिती आहे. मी खरंतर पहिलंच करायला हवं होतं, पण मला खरं तर सुईची फार भीती वाटते. त्यामुळे मी कधी इंजेक्शन घेण्याचंही धाडस केलं नाही. माझा रक्तगटही तेच सांगतं. माझा रक्तगट ए निगेटिव्ह आहे. त्यामुळे एखाद्या दुर्मिळ रक्तगट असणाऱ्या व्यक्तीने रक्तदान करणं हे महत्त्वाचं आहे. माझे डॉक्टर सांगायचे, रक्त ही एकच गोष्ट आहे जी व्यक्ती जिवंत असताना दान करू शकते आणि तू ते करायला हवंस”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रिया पुढे म्हणते, “मी जर आता माझ्या भीतीवर मात केली नसती तर मला खूप पश्चाताप झाला असता. त्यामुळे कोरोनातून बरं झाल्यानंतर मी माझ्या भीतीवर मात करण्याचा निर्णय घेतला. किमान एक जीव वाचवण्यासाठी मी जे काही करू शकते ते केलं. फक्त रक्तदान करून मला काही बळ मिळालं आहे. मी जे करू शकत होते ते केलं. आज मी कोणत्याही अँक्झायटीशिवाय शांत झोपू शकेन. आज मी झोपेन, या भुयाराच्या पलीकडे एक प्रकाश आपल्याला नक्कीच प्रकाश दिसेल अशी आशा मला आहे.”

    follow whatsapp

    ADVERTISEMENT