Patna रेल्वे स्टेशनवर पॉर्न व्हिडिओ, अडल्ट अभिनेत्रीने का शेअर केला स्वत:चा फोटो?
Patna Railway Station Viral Video: बिहारच्या पाटणा रेल्वे स्थानकावर रविवारी टीव्ही स्क्रीनवर अचानक एक अडल्ट फिल्म सुरू झाली. यानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. ज्यानंतर ही घटना सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. मात्र, आता याच प्रकरणी एका प्रसिद्ध पॉर्न स्टारने एक मजेशीर ट्विट केले आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ही व्हिडीओ क्लिप माझीच आहे. […]
ADVERTISEMENT

Patna Railway Station Viral Video: बिहारच्या पाटणा रेल्वे स्थानकावर रविवारी टीव्ही स्क्रीनवर अचानक एक अडल्ट फिल्म सुरू झाली. यानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. ज्यानंतर ही घटना सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. मात्र, आता याच प्रकरणी एका प्रसिद्ध पॉर्न स्टारने एक मजेशीर ट्विट केले आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ही व्हिडीओ क्लिप माझीच आहे.
पॉर्न स्टार केंद्रा लस्टने (Kendra Lust) मंगळवारी तिचा फोटो ट्विट केला आणि त्यासोबत ‘बिहार रेल्वे स्टेशन’ #BiharRailwayStation असा हॅशटॅग वापरला. याशिवाय तिने या ट्विटमध्ये कशाचाही उल्लेख केलेला नाही.
यानंतर सर्व यूजर्स रिप्लाय सेक्शनमध्ये ट्विट करू लागले. काही यूजर्सने विचारले की ती क्लिप तुझी आहे का? केंद्रा लस्टने यावर लिहिलं की, ‘मला आशा आहे की तेच असावं… LOL’ केंद्राचे हे ट्विट व्हायरल होत आहे. आतापर्यंत 6 लाखांहून अधिक लोकांनी ते ट्विट पाहिलं आहे.
केंद्रा ही सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. ट्विटरवर तिचे 1.5 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याचवेळी इंस्टाग्रामवर 85 लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करतात.
