गाड्या फोडू, टोलनाका फोडू!, कल्याण-शिळफाटा ट्रॅफिकवरून मनसेचा संताप

मिथिलेश गुप्ता

कल्याण-शिळफाटा मार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीवरून मनसे नेते राजू पाटील यांनी प्रशासन आणि टोल व्यवस्थापनाला आक्रमक इशारा दिला आहे.

ADVERTISEMENT

kalyan dombivli shilphata traffic jam mns raju patil toll naka warning
शिळफाटा ट्र्रॅफिकप्रकरणी मनसे आक्रमक
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

अवेळी अवजड वाहने सोडल्यास गाड्या फोडू, तीन दिवसांत रस्ते दुरुस्त करा, अन्यथा टोलनाका फोडू!

point

राजू पाटील यांचा प्रशासनाला थेट इशारा

point

शीळफाट्यात वाहतूक कोंडीचा भडका! मनसेचे जनआंदोलन, वाहतूक विभाग आणि टोल प्रशासनाला अल्टिमेटम

कल्याण: कल्याण-शिळफाटा मार्गावरील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या डोंबिवली शहर शाखेच्या वतीने रविवारी शिळफाटा जंक्शन येथे जनआंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान मनसे नेते राजू पाटील यांनी वाहतूक विभागासह संबंधित प्रशासन आणि टोल व्यवस्थापनाला धारेवर धरत तीव्र इशारा दिला. अवजड वाहने अवेळी सोडल्यास गाड्या फोडू, तर तीन दिवसांत रस्त्यांची डागडुजी न केल्यास टोलनाकाही फोडू, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. यावेळी मनसेचे नेते राजू पाटील, मनसे शहराध्यक्ष हर्षद पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष अमित म्हात्रेसह मोठ्या संख्येने सामान्य नागरिक उपस्थित होते.

कल्याण-शिळफाटा मार्गावर मेट्रोची कामे, विविध ठिकाणी सुरू असलेली रस्त्यांची कामे, अपुरी रस्तेक्षमता आणि अवजड वाहनांची वाढती वर्दळ यामुळे दररोज वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीचा फटका नोकरदार, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अत्यावश्यक सेवांना बसत आहे. नागरिकांना दररोज प्रवासासाठी मोठा वेळ खर्च करावा लागत असतानाही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप मनसेने केला.

शिळफाट्याची अवस्था स्ट्रेट ऑफ हॉर्मुझसारखी!

आंदोलनादरम्यान बोलताना राजू पाटील यांनी शिळफाटा मार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर जोरदार टीका केली. या रस्त्याची अवस्था ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’सारखी झाली असून, वाहनांना पुढे जाणेही कठीण झाले आहे, अशा शब्दांत त्यांनी परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली. वाहतूक कोंडीला वाहतूक विभागाची कार्यपद्धती जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांना अनेक वर्षे लागण्याची शक्यता असताना आणि रस्त्यांसाठी आवश्यक जागाही अद्याप पूर्णपणे ताब्यात आलेली नसताना अशा कामांना परवानगी दिलीच कशी जाते, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. विकासकामांचे नियोजन आणि वाहतूक व्यवस्थापन यांच्यात समन्वय नसल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा>> भिवंडी: गुलाबजामच्या भांड्यात आढळला उंदीर, Video व्हायरल अन् FDA ची कारवाई

शिळफाटा मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे राजू पाटील यांनी म्हटले. अवजड वाहने ठराविक वेळेत आणि टप्प्याटप्प्याने सोडल्यास वाहतुकीचा ताण कमी होऊ शकतो. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास मनसे स्वतःहून रस्त्यावर उतरून कारवाई करेल, असा इशारा त्यांनी दिला. यापुढे अवजड वाहने अवेळी सोडल्यास संबंधित गाड्या फोडू, असा संतप्त इशारा पाटील यांनी दिल्याने