शिरसाटांचे संभाव्य मंत्रिपद हुकणार? विस्तारापूर्वीच अॅड. सदावर्तेंनी केले गंभीर आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : शिंदे गटातील औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी बाबा कंस्ट्रक्शन्स या बांधकाम क्षेत्रातील कंपनीला धमकावले आहे, असा आरोप करत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी खळबळ उडवून दिली आहे. सोबतच या धमकीप्रकरणाशी निगडित एक कॉल रेकॉर्डिंग असल्याचा दावाही सदावर्ते यांनी केला आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी काय केले आरोप :

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायधीशांच्या निवासासाठी इमारत बांधण्यात येत आहे. या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवली नाही. हे कंत्रात ४७ कोटी रुपयांचे आहे. मात्र यासाठी वंडर ही कंपनी अपात्र आहे. या कंपनीने निविदा भरताना बीडमध्ये सात मजली रुग्णालयाचे बांधकाम केल्याचे सांगितले आहे.

मात्र संबंधित इमारत सात मजल्यांची नाही. चुकीची माहिती सादर करून या कंपनीने कंत्रात मिळवले. त्याचवेळी वर्क ऑर्डर देण्याआधी आमचे पक्षाकार बाबा कंस्ट्रक्शन कंपनीला संजय शिरसाट यांच्या स्वीय सहाय्यकांनी बोलावले. तिथे आमच्या पक्षकाराला धमकी देण्यात आली. ही बाब न्यायालयाच्या लक्षात आणून देण्यात आली आहे, असा आरोप सदावर्ते यांनी केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शिरसाटांचे संंभाव्य मंत्रिपद हुकणार?

दरम्यान, या आरोपांमुळे संजय शिरसाट यांचे संभाव्य मंत्रिपद हुकणार का? असा सवाल सध्या विचारला जात आहे. यापूर्वी विस्तारात स्थान न मिळाल्याने संजय शिरसाट नाराज असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत त्यांनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवली आहे. याशिवाय संघटनेतील नेतेपदावरही शिरसाट यांना संधी देण्यात आलेली नाही.

त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिरसाट यांना मंत्रिपद देऊन त्यांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच सदावर्ते यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे शिरसाट अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची मंत्रिपदाची संधी हुकणार का? असा सवाल विचारला जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT