‘राष्ट्रवादीची शिवसेना’ : ‘त्या’ संभाषणावर भास्कर जाधव अन् अजित पवार पहिल्यांदाच बोलले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

(NCP and Shivsena news in marathi)

ADVERTISEMENT

नागपूर : ‘राष्ट्रवादीची शिवसेना’ या कथित संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव यांना प्रचंड टिकेला सामोर जावं लागलं. मात्र आता यावर भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधी पक्ष नेते अजित पवार या दोघांनीही सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय घडलं?

शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाजपसह बंडखोर नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसकडे गहाण ठेवली आहे, असं म्हटलं होतं. ठाकरे गटाचे नेते हे आरोप फेटाळून लावतात. मात्र नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनी हे हसत हसत मान्य केल्याचं बोललं जात आहे.

हे वाचलं का?

हिवाळी अधिवेशनादरम्यान एका पत्रकार परिषदेत मध्यभागी अजित पवार, त्यांच्या बाजूला डाव्या बाजूने भास्कर जाधव आणि जयंत पाटील दिसत आहेत. अजित पवारांचं बोलणं सुरु होण्यापूर्वी जयंत पाटील भास्कर जाधवांना म्हणतात, आमची शिवसेना, राष्ट्रवादीची शिवसेना, त्यावर भास्कर जाधव हसतात आणि होकार देतात. तसंच त्या वक्तव्याचा पुनरुच्चारही करतात. मनसे नेते संतोष धुरी यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

ADVERTISEMENT

भास्कर जाधवांचे स्पष्टीकरण :

दरम्यान या सर्व प्रकारावर भास्कर जाधव यांनी मात्र आपला आवाज दाखवला जात नसल्याचं म्हटलं आहे. न्यूज18 लोकमतसोबत बोलताना भास्कर जाधव म्हणाले, “हो हो राष्ट्रवादीची शिवसेना एवढचं तुम्ही दाखवत आहात. परंतु माझा आवाज मात्र दाखवत नाहीत. ठीक आहे आम्ही गंमतीमध्ये काय म्हणालो त्याचं तुम्ही भांडवल करुन चॅनेल चालवत आहात. आम्ही खाजगीमध्ये काय बोलायचं आणि काय नाही हे कोणी ठरवायचं? तुम्ही ठरवायचं? भाजपने ठरवायचं का? काय खायचं, काय बोलायचं? हे ठरवणार का? मला काहीही खुलासा करायचा नाही. मी स्वतः बोलताना संयम बाळगत असतो”.

ADVERTISEMENT

अजित पवार पहिल्यांदाच बोलले…

या संभाषणावर खुलासा करताना अजित पवार म्हणाले, कोणाच्याही दुजोऱ्याला काही अर्थ नाही. त्यांची शिवसेना त्यांच्या बरोबर आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करतो. राष्ट्रवादीचे विचार आम्ही पोहोचवतो आणि काँग्रेस त्यांचे काम करते. समाजवादी पार्टी, सीपीआय असेल सीपीएम असेल, शेकाप असेल. सगळे पक्ष आपआपल्या परीने काम करत असतात.

आता काही वेळेस राजकीय काही स्थित्यंतर अशी घडतात, जसं मागे अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना एका पक्षाचा सरकार यायचे दिवस संपलेले होते, म्हणून एनडीए स्थापन झालं. तसंच त्यानंतर यूपीए स्थापन झालं.

त्याचा नेतृत्व सोनिया गांधी आणि डॉ. मनमोहन सिंगजी करत होते आणि त्यानंतरच्या काळामध्ये आज देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी करतात. त्याच्यावर तुम्ही कारण नसताना ‘ध’ चा ‘मा’ करण्याचा प्रयत्न करू नका. जे ते पक्ष आणि त्यांचे विचारधारा त्यांची विचारसरणी ही त्यांच्याबरोबर आहे आणि ते आपापल्या परीने ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT