जितेंद्र आव्हाडांवर दुसरा गुन्हा : अजित पवार संतापले, शिंदे-फडणवीसांना म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जितेंद्र आव्हाडांविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्ह दाखल झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी संताप व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची भूमिका मांडली.

ADVERTISEMENT

पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याबद्दल भाष्य केलं. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर २४ तासांत दोन गुन्हे दाखल करण्यात आले. लोकप्रतिनिधींवर अशाप्रकारे विनयभंगाचा गुन्हा लावणे हा अतिशय भ्याड हल्ला आहे”, असं अजित पवार म्हणाले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अशाप्रकारचे वातावरण करून जे महत्त्वाचे विषय आहेत, त्याला बगल देण्याचं काम होतंय हे महाराष्ट्राला मारक आहे”, असा दावाही अजित पवारांनी केला.

हे वाचलं का?

जितेंद्र आव्हाडांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा : नेमकं काय घडलं, पाहा ‘त्या’ घटनेचा व्हिडीओ

“सरकारने लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचा आहे, हे न पाहता जर कुणी कायदा हाती घेतला. चूक केली. नियमाप्रमाणे वागले नाही, तर जरूर कारवाई करावी. मात्र कारण नसताना नवीन कायदे नियमाचा आधार घेऊन लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याचे, जनमानसात त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम कोणी करत असेल, तर याकडे जनतेनं जागरुकतेनं पाहावं”, असंही ते म्हणाले.

ADVERTISEMENT

“जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यात यावा, अशी मागणीही अजित पवारांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत केली.

“मी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय”, विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच जितेंद्र आव्हाडांचं ट्विट

ADVERTISEMENT

अजित पवारांच्या भूमिकेकडे होतं सगळ्यांच लक्ष

हर हर महादेव चित्रपटातल्या काही दृश्यांवर आक्षेप घेत जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यातल्या चित्रपटगृहात जाऊन शो बंद पाडला होता. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही झाली होती. या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना जामीन मिळाला, तरी अजित पवार यांनी कोणत्याही प्रकारचं भाष्य केलं नव्हतं. त्यामुळे अजित पवार नव्या प्रकरणाबद्दल बोलणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT