अकोला: आरोपीसोबत अनैसर्गिक कृत्य, एक पोलीस कर्मचारी निलंबित

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

धनंजय साबळे, अकोला: अकोला क्राइम ब्रांच पोलिसांनी आरोपीसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. पण या संपूर्ण प्रकरणाचा चौकशी अहवाल मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

ADVERTISEMENT

शेगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेने एका चोरी प्रकरणात एका सराफा व्यवसायिकाला ताब्यात घेतले होते. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून काही सोने जप्त केले आणि त्याला या प्रकरणात आरोपी केले होते. पोलिस तपासात या आरोपीसोबत पोलीस कर्मचाऱ्यांनी अनैसर्गिक कृत्य केल्याचा आरोप आरोपीने पोलिस अधीक्षकांकडे केला होता.

अखेर या प्रकरणाची संपूर्ण चौकशी सुरू केल्यानंतर प्राथमिकदृष्ट्या हे प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात आल्याने या प्रकरणात चौकशीदरम्यान कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करू नये म्हणून त्याला निलंबित करण्यात आले आहे. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि इतर दोन जणांवर देखील कारवाई केली जाणार असल्याचं समजतं आहे. पण या प्रकरणात पोलिसांनी अद्यापही दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती समोर आली आहे.

हे वाचलं का?

काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या एका पथकाने शेगाव येथील सराफा व्यापाऱ्याला चोरीचे सोने विकत घेतल्याच्या संशयावरून आरोपी करत त्याला चौकशीकामी ताब्यात घेतले येईल होते. यावेळी सखोल चौकशी करण्यासाठी त्याची पोलीस कोठडी घेतली होती. याचवेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण व शक्ती कांबळे व त्याच्या दोन साथीदारांनी व पोलिसांनी आरोपीसोबत अनैसर्गिक कृत्य करून पायावर गरम पाणी टाकल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.

तरुणांना खोट्या गुन्ह्यात अडकवणारे 5 पोलीस निलंबित, नेमकं प्रकरण काय?

ADVERTISEMENT

आरोपीने पोलिसांवरील केलेले आरोप हे गंभीर स्वरुपाचे असल्याने या प्रकरणी अकोला सिटी पोलीस DYSP सुभाष दुधगावकर यांच्या कडे हा तपास देण्यात आला असून त्याचा चौकशी अहवाल मात्र अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. सध्यातरी सहाय्यक पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून शक्ती कांबळे याला निलंबित करण्यात आल्याचं समजतं आहे.

ADVERTISEMENT

पोलिसांनीच अशाप्रकराचं कृत्य केल्याने आरोपीच्या नातेवाईकांनी मात्र प्रचंड संताप व्यक्त केला असून संबंधित पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT