Akshaya Tritiya 2023 Date: कधी आहे अक्षय्य्य तृतीया? जाणून घ्या वेळ, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्व

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

हिंदू परंपरेनुसार, अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya) सण वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. काही ठिकाणी अक्षय्य तृतीयेला ‘अखा तीज’ असेही म्हणतात. अक्षय्य म्हणजे ज्याचा क्षय होत नाही. धार्मिक मान्यतेनुसार अक्षय्य तृतीयेचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी भगवान परशुराम, नर-नारायण आणि हयग्रीव अवतरले होते असे मानले जाते. (Akshaya Tritiya 2023 Date know the time puja vidhi and importance)

ADVERTISEMENT

यादिवसापासून बद्रीनाथचे दरवाजे उघडले जातात आणि वृंदावनात भगवान श्रीकृष्णाच्या चरण दर्शनाला सुरूवात होते. या दिवशी मौल्यवान वस्तू जसं की, दाग-दागिने, घर, वाहने खरेदी केली जातात. अक्षय्य तृतीयेचा संपूर्ण दिवस शुभ असतो. हा दिवस नवीन व्यवसाय, लग्न, सोने किंवा इतर मालमत्तेसारखी महागडी गुंतवणूक आणि कोणतीही नवीन सुरुवात करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी सर्वजण त्यांच्या जीवनात समृद्धी येवो अशी प्रार्थना करतात.

PM मोदी फॉलोअर असलेल्या हिंदुत्ववादी महिलेला गुजरातमध्ये अटक : कोण आहे काजल हिंदुस्तानी?

यंदा किती तारखेला असेल अक्षय्य तृतीया?

यंदा अक्षय्य तृतीया शनिवारी 22 एप्रिल 2023 रोजी असणार आहे आहे.

हे वाचलं का?

रावरंभा चित्रपटात कुशल बद्रिके पहिल्यांदाच दिसणार खलनायकाच्या भूमिकेत!

अक्षय्य तृतीयेदिवशी कशी करावी पूजा विधी?

अक्षय्य तृतीयेला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे विशेष महत्त्व असते. त्यांच्या पूजेने नवीन सुरूवात केली जाते. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे आणि आंघोळीनंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत. मंदिर स्वच्छ करा, त्यानंतर मंदिरातील सर्व देवांना गंगाजल अर्पण करा. नंतर फुले व प्रसाद अर्पण करा. माता लक्ष्मीला लाल रंगाची फुले अर्पण करून भगवान विष्णूला पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करावीत. यानंतर दिवा लावून आरती करावी. घरात सुख-समृद्धी येवो यासाठी देवाकडे प्रार्थना करा आणि हात जोडून आशीर्वाद घ्या.यासोबतच भगवान विष्णूच्या नावाने गरिबांना अन्नदान करणे किंवा दान करणे अत्यंत पुण्यदायी आणि फलदायी ठरते.

Dalai Lama video : चुंबन व्हिडीओचा वाद वाढला! दलाई लामांनी सोडलं मौन, म्हणाले…

अक्षय्य तृतीयाचे महत्त्व काय?

अक्षय्य तृतीयेचा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. हिंदू धर्माच्या पौराणिक कथेनुसार या पवित्र दिवसापासून त्रेतायुग सुरू झाले. हा दिवस वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे जो सर्वात शुभ आहे. यादिवशी गंगा स्नान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. जी व्यक्ती यादिवशी गंगा स्नान करते ती व्यक्ती निश्चितच सर्व पापांमधून मुक्त होते असे म्हटले जाते. या दिवशी आपण आपल्या पूर्वजांचे विधीवत श्राद्ध करणे शुभ मानले जाते. आपल्या पूर्वजांच्या नावाने गहू, हरभरा, दही-तांदूळ, दुधापासून बनवलेले पदार्थ आपण दान करू शकतो.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT