मी मुसलमान असूनही मला एकनाथ शिंदेच्या हिंदुत्वावर पूर्ण विश्वास- अब्दुल सत्तार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

धनंजय साबळे, प्रतिनिधी, अकोला

ADVERTISEMENT

अकोला: कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी विनायक राऊत यांच्या गंभीर टीका केली आहे. विनायक राऊतांनी सध्याच्या सरकारवरती निशाणा साधला होता. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारनं केलं या टीकेला उत्तर देताना अब्दुल सत्तार म्हणाले ”सरकारने जे निर्णय घेतले, गेल्या 20 दिवसापासून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहोत. त्यांनी अडीच वर्षात जे निर्णय घेतले त्यांनीच शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली.”

आम्ही धनुष्यबाणावरच निवडणूक लढवू- अब्दुल सत्तार

तुम्ही भाजपच्या चिन्हावर निवडणुका लढवणार का? यावर अब्दुल सत्तार म्हणाले ”चिन्हाची निश्चिती शिंदे सरकारकडूनच होईल आणि आम्ही धनुष्यबाणावरच निवडणूक लढवू. एकनाथ शिंदे यांना हिंदुत्वाचे लायसन्स देण्याची कोणाला गरज नाही. मी एक मुसलमान असूनही मला एकनाथ शिंदे यांच्या हिंदुत्वावर पूर्ण विश्वास आहे.”

हे वाचलं का?

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये यायला बाकी पक्षातील नेत्यांच्या रांगा- अब्दुल सत्तार

”शिंदे-फडणवीस सरकारमध्ये बाकी पक्षातील नेत्यांच्या रांगा लागलेल्या आहेत. कोणाला घ्यायचं कोणाला नाही हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील, त्यांना भाजपमध्ये घ्यायचं ते भाजपं ठरवतील, ज्यांना शिंदे सेनेत यायचं आहे ते मुख्यमंत्री ठरवतील. माझ्या पक्षाची बांधणी आणि त्याची मजबुती करण्याचं काम मला एक निष्ठेने करायचे आहे. आज अकोल्यात एक हजार कार्यकर्त्यांनी आमच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.” असे अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

फुलहार म्हणजेच पूजा नाही, हिंदुत्व नाही- अब्दुल सत्तार

आज सामनातून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हिंदुत्वांवर टीका केली होती. यावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले ”फुलहार म्हणजेच पूजा नाही, हिंदुत्व नाही. या सरकारने हिंदुत्वासाठी जे निर्णय घेतले असे निर्णय या अगोदर कोणत्याही सरकारने घेतलेले नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नक्कीच योग्य तो निर्णय संस्थेची बोलून घेण्याचं वक्तव्य त्यांनी केले आहे.

ADVERTISEMENT

कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करतो आणि त्याचे कर्ज थकते यावरून बँकेत शेतकऱ्यांचा सिबिल स्कोर खराब होतो. यावर अब्दुल सत्तारांनी योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं आहे. शेतकऱ्यांना शेतमालाला कसा भाव देण्याचं काम करायचं आहे, त्याचा एक प्लान तयार केला आहे, म्हणूनच गेल्या वीस दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT