अमोल कोल्हे-रोहित पवारांमध्ये ऑनलाईन जुंपली : ट्विटरवरुन एकमेकांना टोले-प्रतिटोले

मुंबई तक

पुणे : सत्ताधारी आणि विरोधक नेते एखाद्या मुद्द्यावरुन आमने-सामने येण्याचा प्रकार अनेकदा पाहतो. मात्र आता एकाच पक्षातील दोन बडे नेते एकमेकांसमोर उभं राहिल्यांच रविवारी समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यामध्येच ट्विटरवरुन चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. दोघांनीही जाहिरपणे एकमेकांना टोले-प्रतिटोले दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यांचा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पुणे : सत्ताधारी आणि विरोधक नेते एखाद्या मुद्द्यावरुन आमने-सामने येण्याचा प्रकार अनेकदा पाहतो. मात्र आता एकाच पक्षातील दोन बडे नेते एकमेकांसमोर उभं राहिल्यांच रविवारी समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यामध्येच ट्विटरवरुन चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. दोघांनीही जाहिरपणे एकमेकांना टोले-प्रतिटोले दिले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शनिवारी छत्रपती संभाजी महाराज यांच्या वढू बुद्रुक येथील समाधी स्थळी आत्मक्लेश आंदोलन केलं. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार अशोक बापू पवार, अमोल मिटक, प्राजक्त तनपुरे, संदीप क्षीरसागर, नितीन पवार यांनीही उपस्थिती लावली होती. सोबत इतरही अनेक स्थानिक कार्यकर्तेही उपस्थित होते

डॉ. अमोल कोल्हे अनुपस्थित :

मात्र या सर्वांत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या अनुपस्थितीची बरीच चर्चा रंगली. मागील काही दिवसांपासून अमोल कोल्हे भाजपच्या जवळ जात असल्याच्या चर्चा सुरु असल्याने त्यांच्या अनुपस्थितीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यानंतर आता स्वतः अमोल कोल्हे यांनी भाजप नेत्यासोबतचा फोटो ट्विट करुन आपण आंदोलनाला का उपस्थित नव्हतो याचं कारण सांगितलं आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, काल वढू तुळापूर येथे करण्यात आलेल्या आत्मक्लेश आंदोलनाची मला पूर्वकल्पना नसल्यामुळे मी उपस्थित नव्हतो. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहोचावा म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित “शिवपुत्र संभाजी” महानाट्यासंदर्भात केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांची भेट घेऊन चर्चा केली, अशी माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp