Rahul Solapurkar : "दिलगिरी सुद्धा नशा करुन मागितली, गुन्हा दाखल झाला पाहिजे", अंधारे, मिटकरी आक्रमक
अमोल मिटकरी यांनी राहुल सोलापूरकरबद्दल बोलताना म्हटलंय की, त्याने दिलगिरी सुद्धा नशा करुन मागितली आहे. याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सुषमा अंधारे, अमोल मिटकरी आक्रमक

राहुल सोलापूरवर गुन्हादाखल करण्याची मागणी

राहुल सोलापूरकरने नशा करुन दिलगिरी व्यक्त केली
Rahul Solapurkar : अभिनेता राहुल सोलापूरकर याने शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या एका वक्तव्यानं वाद निर्माण झाला. सोलापूरकरविरोधात मोठा संताप महाराष्ट्रभरात निर्माण झाला. त्यानंतर राहुल सोलापूरकरने माफी मागितली. मात्र, ही चूक अक्षम्य असल्यानं फक्त माफी मागितली म्हणून माफ करु नका, तर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी आता होतेय. अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी, ठाकरेंच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ही मागणी केली आहे.
हे ही वाचा >> 'धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा, मी सुद्धा एका सेकंदात...' मंत्री प्रताप सरनाईकांचं मोठं विधान
अमोल मिटकरी यांनी याबद्दल बोलताना म्हटलंय की, राहुल सोलापुरकरने थातुरमातुर दिलगिरी व्यक्त केली असली तरी हिरकणीबद्दल केलेलं वक्तव्य, मोईनखान, पेटारे नसल्याची बतावणी, आग्रा सुटकेत हुंडा वठवल्याचे पुरावे अद्याप सादर केले नाहीत. त्याने दिलगिरी सुद्धा नशा करुन मागितली आहे. याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
हे ही वाचा >> Kalyan : मिठाईमध्ये आढळले जिवंत किडे, ग्राहकानं जाब विचारताच दुकानदारानं घातला वाद, पोलिसात...
सुषमा अंधारे यांनीही राहुल सोलापूरकरवर कारवाईची मागणी केली आहे. "चौफेर टीके नंतर राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवरायांच्या संबंधाने केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र ठरवून आधी खोडसाळपणा करणारे आणि नंतर दिलगिरी व्यक्त करणाऱ्या अशा खोडसाळ प्रवृत्तीकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. IPC 295 अंतर्गत राहुल सोलापूरकर वर गुन्हा दाखल व्हायला हवा. शिवाय हा सोलापूरकर च्या प्राच्यविद्या भांडारकर संस्थेचा पदाधिकारी आहे या संस्थेला मिळणाऱ्या शासकीय मदत निधीची सुद्धा चौकशी व्हायला हवी. कारण अनेक वर्षांपूर्वी जेम्स लेन प्रकरणात राष्ट्रमाता जिजाऊंच्या संबंधाने बदनामीकारक मजकूर छापण्यास मदत करणारे भांडारकर ट्रस्ट शीच संबंधित होते." असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.