Kalyan : मिठाईमध्ये आढळले जिवंत किडे, ग्राहकानं जाब विचारताच दुकानदारानं घातला वाद, पोलिसात...

मुंबई तक

कल्याण यशवंतराव चव्हाण क्रीडांगणाजवळील बिकानेर नावाच्या दुकानातून कल्याण पश्चिम परिसरातील रहिवासी सुनीता भगत यांनी मिठाई खरेदी केली होती.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कल्याणमध्ये मिठाईमध्ये आढळले जिवंत किडे

point

ग्राहकाने मिठाई घरी आणून उघडताच बसला धक्का

point

जाब विचारल्यावर दुकानदाराचा ग्राहकाशीच वाद

Kalyan : कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ग्राहकाला मिठाईमध्ये जिवंत किडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधित ग्राहकाने महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाला कळवलं असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

हे ही वाचा >> 'धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा, मी सुद्धा एका सेकंदात...' मंत्री प्रताप सरनाईकांचं मोठं विधान

कल्याण पश्चिम परिसरातील रहिवासी सुनीता भगत यांनी कल्याण यशवंतराव चव्हाण क्रीडांगणाजवळील बिकानेर नावाच्या दुकानातून मिठाई खरेदी केली होती. जेव्हा त्या घरी गेल्या आणि मिठाई उघडली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. भगत यांनी दुकानदाराला या प्रकरणात उत्तर विचारले तेव्हा त्यांच्यात वाद सुरू झाला.

हे ही वाचा >> अंजली दमानियांच्या 2 पत्रकार परिषदा, धनंजय मुंडे संतापले; आता थेट....

दुकानदाराने ग्राहक महिलेशी वाद घातल्यानंतर ग्राहक सुनीता भगत यांनी तातडीने कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने अन्न आणि औषध प्रशासनाला (एफडीए) कळवलं. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. संबंधित मिठाई दुकानावर कारवाई होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp