Nagpur Crime: शेजाऱ्याचं अनुकरण करत गळफास लावण्याचा प्रयत्न केला, ११ वर्षांचा मुलगा जिवानिशी गेला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

ADVERTISEMENT

Nagpur Crime लहान मुलं कायमच अनुकरण करत असतात. मात्र ते कुठल्या गोष्टींचं अनुकरण करत आहेत याकडे लक्ष दिलं नाही तर अनर्थ ओढवू शकतो. नागपूरमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. शेजाऱ्याने गळफास घेतल्याचं पाहून एका ११ वर्षांच्या मुलाने तसाच प्रय़त्न केला आणि गळफास लागून त्या मुलाचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या दफई किरणापूरमध्ये ही घटना घडली आहे.

साहिल मेश्राम असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. साहिलने शेजारी राहणाऱ्या अनिल नेवारेला दारूच्या नशेत गळफास घेतानना पाहिलं होतं. त्याचं अनुकरण करत गंमत म्हणून साहिलनेही गळफास लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे वाचलं का?

नागपूर : अनेकांना फसवणारी ‘लुटेरी दुल्हन’ अखेरीस अटकेत

काय घडली घटना?

ADVERTISEMENT

शेजाऱ्याने गळफास घेतल्याचे पाहिल्यानंतर गंमत म्हणून ११ वर्षीय साहिल मेश्राम या मुलाने गळफास लावला. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दफई किरणापूर येथे घडली. साहिलने शेजारी राहणारा अनिल नेवारे याला दारूच्या नशेत गळफास घेताना पाहिले होतं. त्याचं पाहून साहिलनेही गंमत म्हणून गळफास लावून पाहिला. त्यात त्याचा मृत्यू झाला. घटना घडली तेव्हा आई शेजाऱ्याकडे बसली होती आणि वडील मजुरीवर गेले होते.

ADVERTISEMENT

नागपूर : हॉटेल ब्रिज इनमधल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दिल्ली, मुंबईतल्या तरूणी आढळल्या

जेव्हा साहिलचा मोठा भाऊ घरी आला तेव्हा त्याला साहिल हा लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर त्याने आईला सांगितले. शेजाऱ्यांच्या मदतीने लगेच साहिलला रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील ही घटना बघितल्यानंतर पालकांनी मुलांसोबत सतत संवाद करत राहून त्यांच्या मनात नेमकं काय चाललं यावर लक्ष ठेवण्याची अधिक गरज निर्माण झाली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT