जाणून घ्या अनिल अंबानीच्या सूनबाई कृशा शाहविषयी

मुंबई तक

अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचा मुलगा अनमोल याने कृशा शाह हिला आपलं जोडीदार म्हणून निवडलं आहे. दोघं 20 फेब्रुवारीला लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. कृशा ही एक बिजनेस वुमन आणि सोशल वर्कर आहे. ती आपला भाऊ मिशाल शाह याच्यासह DYSCO नावाची कंपनी चालविते. कृशा हिने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून सामाजिक निती आणि विकास या विषयातून […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचा मुलगा अनमोल याने कृशा शाह हिला आपलं जोडीदार म्हणून निवडलं आहे.

दोघं 20 फेब्रुवारीला लग्नाच्या बंधनात अडकले आहेत.

कृशा ही एक बिजनेस वुमन आणि सोशल वर्कर आहे. ती आपला भाऊ मिशाल शाह याच्यासह DYSCO नावाची कंपनी चालविते.

कृशा हिने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून सामाजिक निती आणि विकास या विषयातून आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

तिने काही दिवस युकेमधील एक्सेंचरसाठी काम केलं होतं. नंतर ती भारतात परतली.

कृशाने Covid-19 च्या काळात मानसिक स्वास्थ्याशी संबंधित #Lovenotfea नावाने मानसिक स्वास्थ अभियान सुरु केलं होतं.

सहा महिन्यांपूर्वीच कृशाचे वडील निकुंज शाह यांचं निधन झालं आहे. तर कृशाची आई निलम शाह ही एक फॅशन डिझायनर आहे.

याशिवाय कृशाला आणखी एक मोठी बहीण देखील आहे. जी एक फॅशन ब्लॉगर आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp