राज ठाकरेंविरोधात आणखी एक अजामीनपात्र अटक वॉरंट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गेल्या दोन महिन्यांपासून चांगलीच चर्चा आहे. हनुमान चालीसा Hanuman Chalisa आणि भोंग्याविरोधात उभारलेल्या आंदोलनांमुळे राज ठाकरे चर्चेत आहेत. आता राज ठाकरेंशी संबंधित आणखी एक बातमी समोर आली आहे. राज ठाकरेंच्या विरोधात सांगलीच्या शिराळा कोर्टाने अजामीन पात्र वॉरंट जारी केलं आहे. २८ एप्रिल २०२२ ला राज ठाकरेंसह १० जणांविरोधात शिराळा न्यायदंडाधिकाऱ्यांनी […]
ADVERTISEMENT
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गेल्या दोन महिन्यांपासून चांगलीच चर्चा आहे. हनुमान चालीसा Hanuman Chalisa आणि भोंग्याविरोधात उभारलेल्या आंदोलनांमुळे राज ठाकरे चर्चेत आहेत. आता राज ठाकरेंशी संबंधित आणखी एक बातमी समोर आली आहे. राज ठाकरेंच्या विरोधात सांगलीच्या शिराळा कोर्टाने अजामीन पात्र वॉरंट जारी केलं आहे.
ADVERTISEMENT
२८ एप्रिल २०२२ ला राज ठाकरेंसह १० जणांविरोधात शिराळा न्यायदंडाधिकाऱ्यांनी अजामीनपात्र वॉरंट (Non-bailable warrant)बजावलं होतं. त्यासंदर्भातली सुनावणी ८ जून रोजी झाली. या सुनावणीला राज ठाकरे गैरहजर होते त्यामुळे त्यांच्या विरोधात आणखी एक अजामीनपात्र वॉरंट काढलं गेलं आहे.
हे वाचलं का?
२००८ मध्ये राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर जे आंदोलन झालं त्या प्रकरणी शिराळा कोर्टाने वॉरंट काढलं होतं. सध्या राज ठाकरे यांची प्रकृती चांगली नाही. त्यांच्यावर रूग्णालयात शस्त्रक्रियाही होणार होती मात्र त्यांच्या शरीरात कोरोनाच्या पेशी आढळल्याने ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. याच कारणामुळे राज ठाकरे हे सुनावणीसाठी हजर राहू शकले नाहीत.
MNS: पुण्यात राज ठाकरे कोणावर बरसले?, फक्त ‘हे’ 15 मुद्देच वाचा!
ADVERTISEMENT
राज ठाकरेंच्या ऐवजी शिरीष पारकर हजर होते. आता राज यांच्याविरोधात वॉरंट काढलं आहे. रेल्वे भरतीमध्ये २००८ मध्ये ‘स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्या,’ या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनात कल्याण कोर्टाच्या आदेशाने राज ठाकरेवर अटकेची कारवाई झाली होती. या अटकेच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावात मनसे कार्यकर्त्यांनी बंद पुकारला आणि जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास दुकानदारांना भाग पाडलं होतं. विनापरवाना बंद पुकारल्यामुळे शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत हा खटला सुरु आहे.
ADVERTISEMENT
बीडच्या कोर्टानेही जारी केला वॉरंट
सांगली आधी बीडच्या परळी जिल्हा कोर्टानेही राज ठाकरेंच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट लागू केला आहे. राज ठाकरेंनी मराठी पाट्यांसाठी आंदोलन केलं होतं. त्यासंदर्भातल्या प्रकरणात हे वॉरंट लागू केला गेला होता. या प्रकरणी परळी कोर्टाने मुंबई पोलिसांना पत्रही लिहिलं होतं.
राज यांच्या विरोधात आजवर अनेक केसेस आहेत. त्यासंदर्भात राज ठाकरेही भाष्य करतात. राज ठाकरे हे त्यांच्या आक्रमक भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी भाषण केल्यानंतर त्याचे पडसाद पुढचे आठ- दहा दिवस उमटत असतात हे आपण पाहिलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT