कोर्लई गावातले 19 बंगले रश्मी ठाकरेंच्या नावावर आहेत का? सरपंच उत्तर देत म्हणाले…
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील रश्मी ठाकरे, मनीषा वायकर यांच्या नावे साडे नऊ एकर जमीन आहे. या जमिनीवर 19 बंगले असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सदरच्या जागेवर 19 बंगले नाहीत असे ठासून सांगितले. जर बंगले असतील तर राजकारण सोडू असे म्हटले होते. प्रत्यक्षात या […]
ADVERTISEMENT

रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील रश्मी ठाकरे, मनीषा वायकर यांच्या नावे साडे नऊ एकर जमीन आहे. या जमिनीवर 19 बंगले असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सदरच्या जागेवर 19 बंगले नाहीत असे ठासून सांगितले. जर बंगले असतील तर राजकारण सोडू असे म्हटले होते. प्रत्यक्षात या जागेची स्थळपाहणी केली असता या जागेवर बंगले नाहीत. या जागेवर नारळाची झाडं, गुरांचा गोठा, पंप, शेड, विहीर ,पाण्याच्या टाक्या , साठवण तलाव असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात रश्मी ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारचा माफीनामा मागितला नसल्याचे कोर्लई सरपंच प्रशांत मिसाळ यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत काय म्हणाले?
किरीट सोमय्या उद्धव ठाकरे यांचे १९ बंगले असल्याचा आरोप करतात. आपण सगळे जण एक दिवस त्या बंगल्यात पिकनिक काढू. जर ते बंगले तुम्हाला दिसले, तर मी राजकारण सोडेन. जर नसतील, तर मुलुंडच्या त्या दलालाला जोड्याने मारू असा इशारा राऊत यांनी सोमय्यांना दिला. दररोज भपंकपणा सुरू आहे. लोकांच्या मनात भ्रम निर्माण करायचं काम सुरू आहे, असं राऊत म्हणाले.










