राजधानी दिल्लीत कोरोनामुळे परिस्थिती गंभीर; मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊनची घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलंय. राजधानी दिल्लीत देखील कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसत आहेत. राज्यातील परिस्थिती चिंताजनक होत असताना नायब राज्यपाल अनिल बैजल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बैठक घेत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. या निर्णयानुसार, आज रात्री 10 वाजल्यापासून ते 26 एप्रिलच्या सकाळपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.

ADVERTISEMENT

दिल्लीत लॉकडाऊनची घोषणा करत अनेक कडक निर्बंधही लावण्यात आले आहेत. या लॉकडाऊनमध्ये विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई असणार आहे. त्याचप्रमाणे आठवड्याअखेरील लॉकडाऊनच्या वेळी जे निर्बंध लावण्यात आले होते तेच निर्बंध असणार आहेत. त्यामुळे आता दिल्लीकरांना एका आठवड्याच्या लॉकडाऊनचं पालन करावं लागणार आहे.

तर दुसरीकडे थिएटर्स, ऑडिटोरियम, स्पा, जिम, स्वीमिंग पूल यांना बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक, राजकीय तसंच धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलीये. खेळाच्या स्टेडियमध्ये प्रेक्षकांविना मॅचेस खेळवल्या जाणार आहेत.

हे वाचलं का?

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं की, “कोरोनाच्या चाचण्या कमी केल्या नसून त्या वाढवण्यात आल्या आहेत. राज्यात दरदिवशी 25 हजारांच्या आसपास रूग्ण सापडत असून बेड्सची कमतरता जाणवतेय. रूग्णालयात औषधं आणि ऑक्सिजनचाही तुटवडा आहे. सध्याची हेल्थ सिस्टीम अधिक रूग्णांचा भार घेऊ शकत नाही. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेणं गरजेचं आहे.”

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT