आर्यन खानचा जामीन आजही नामंजूर, वाचा अटकेपासून आजपर्यंत काय काय घडलं?
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला NCB ने 2 ऑक्टोबरला ड्रग्ज पार्टी आणि क्रूझ पार्टी प्रकरणात अटक केली. मात्र त्याला आजही जामीन मिळू शकलेला नाही. विशेष न्यायालयाने आजही आर्यन खानचा जामीन फेटाळला आहे. त्यामुळे आता त्याला जामीन कधी मिळणार? हा प्रश्न कायम आहे. आजही जामीन देण्यात आला नसल्याने आर्यन खानचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे. […]
ADVERTISEMENT
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला NCB ने 2 ऑक्टोबरला ड्रग्ज पार्टी आणि क्रूझ पार्टी प्रकरणात अटक केली. मात्र त्याला आजही जामीन मिळू शकलेला नाही. विशेष न्यायालयाने आजही आर्यन खानचा जामीन फेटाळला आहे. त्यामुळे आता त्याला जामीन कधी मिळणार? हा प्रश्न कायम आहे. आजही जामीन देण्यात आला नसल्याने आर्यन खानचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे.
ADVERTISEMENT
कोर्टाने आज दिलेल्या या निर्णयामुळे शाहरुख खान, गौरी खान यांनाही मोठा धक्का बसला आहे. आज आर्यनला जामीन मिळेल आणि तो घरी येऊ शकेल अशी आशा या दोघांनाही होती. मात्र आजही जामीन न मिळाल्याने ही आशा फोल ठरली आहे.
मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आर्यन खान कसे दिवस ढकलत आहे?
हे वाचलं का?
काय घडलं होतं त्या दिवशी?
एनसीबीनं एक निवेदन जारी करत संपूर्ण कारवाईची माहिती 3 ऑक्टोबरला दिली. 2 ऑक्टोबरला कार्डेलिया क्रूझवर छापा टाकण्यात आला. क्रूझवरील सर्वांची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. चरस, कोकेन, एमडीएमए ड्रग्ज टॅब्लेट्स आणि एमडी ड्रग्स यावेळी सापडले.
ADVERTISEMENT
महत्त्वाची गोष्ट म्हणजे या क्रूझ पार्टीची एनसीबीला 15 दिवसांपूर्वीच माहिती मिळाली होती. एनसीबीचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी सांगितलं, की क्रूझ पार्टीबद्दल शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि जहाजबांधणी मंत्रालयाला सविस्तर अहवाल दिला जाईल. या पार्टीबद्दल आम्हाला 15 दिवसांपूर्वीच गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतरच आम्ही ऑपरेशन सुरू केलं.
ADVERTISEMENT
एनसीबीचे 22 अधिकारी प्रवासी बनून क्रूझवर गेले. त्यावेळी क्रूझवर 1800 लोक होते. त्यामधूनच अंमली पदार्थ प्रकरणात 8 लोकांना आम्ही शोधून काढलं.
यावेळी, काही जणांकडून ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. या सर्वांनी अत्यंत हुशारीने ड्रग्स आपल्यासोबत आणलं होतं. काही जणांनी हे ड्रग्स आपल्या चप्पल, शर्टची कॉलर, ब्लेट, बॅगेतील हँडल यामध्ये लपवून आणलं होतं. तर काही जणांनी आपल्या अंतर्वस्त्रात देखील ड्रग्स लपवून आणलं होतं.
Drugs Case : नवाब मलिक यांच्या आरोपांना भाजपच्या मनिष भानुशालींनी दिलं उत्तर, म्हणाले..
आर्यन खानला या प्रकरणात अटक झाल्यानंतर विविध प्रकारच्या बातम्या समोर आल्या. तसंच NCB च्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही सगळी कारवाई म्हणजे बनाव असल्याचं म्हटलं. तर NCB ने याला उत्तर देत आपली कारवाई कशाप्रकारे केली गेली हे सविस्तर सांगितलं. नवाब मलिक यांनी तीनवेळा पत्रकार परिषद घेऊन आरोप केले. तर NCB ने तिन्ही वेळा पत्रकार परिषद घेऊन आपण कशी कारवाई केली आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच कसं सगळ्यांना अटक केली हे सांगितलं.
या प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यनचा एक व्हिडिओही एनसीबीच्या हाती लागला आहे. स्वतः एनसीबीनेच चौकशी सुरू असलेल्या आठ लोकांची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंह, मोहक जायस्वाल, विक्रांत छोकर, गोमित चोपडा यांचा समावेश आहे. एनसीबीकडून ताब्यात घेतलेल्या काही लोकांना अटक करण्यासाठीही कार्यवाही सुरू केली आहे. चौकशीदरम्यान, आर्यन खानने आपल्या क्रूझ पार्टीमध्ये पाहुणा म्हणून बोलावण्यात आल्याचं सांगितलं. तसंच पार्टीत सहभागी होण्यासाठी आपल्याला कुणी पैसे वगैरे दिले नाहीत. आयोजकांनी माझं नाव वापरून लोकांना पार्टीमध्ये बोलावल्याचा दावाही आर्यनने केला.
आर्यन खानचा जामीन तीनदा फेटाळला गेला
आर्यन खानच्या जामिनावर आत्तापर्यंत तीनवेळा सुनावणी झाली. 8 ऑक्टोबर, 14 ऑक्टोबर आणि आज (20 ऑक्टोबर) मात्र तिन्ही वेळा त्याला जामीन मिळू शकलेला नाही. न्यायालयाने त्याला ड्रग्ज प्रकरणात कोणताही दिलासा दिलेला नाही. त्यामुळे आर्यन खानचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे. आर्यन खानची केस बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेले वकील सतीश मानेशिंदे लढत आहेत. मात्र तरीही त्याला अद्याप जामीन मिळू शकलेला नाही. आर्यनची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली असून त्याला कैदी नंबरही देण्यात आला आहे.
काय आहे आर्यन खानचा कैदी नंबर?
आर्यन खान याचा तुरुंगातला मुक्काम आणखी वाढला आहे. त्यामुळे त्याला तुरुंगात कैदी नंबर देण्यात आला आहे. हा कैदी क्रमांक 956 असा आहे. त्यामुळे आता आर्यन खानला त्याच्या नावाने नाही तर कैदी क्रमांक 956 अशी हाक मारली जाणार आहे. तुरुंगात असलेल्या प्रत्येकाला कैदी नंबर दिला जातो. त्याचप्रमाणे आर्यन खानलाही कैदी नंबर देण्यात आला आहे. आर्यन खानला 956 हा क्रमांक देण्यात आला आहे. तो जोपर्यंत तुरुंगात राहिल तोपर्यंत त्याला याच नंबराने ओळखलं जाणार आहे.
Aryan Khan च्या समर्थनार्थ Hrithik Roshan ची पोस्ट; पहा नेमकं काय म्हणाला
बॉलिवूड आर्यनच्या पाठिशी
आर्यन खानला अटक झाल्याची बातमी समजतात बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान याने अभिनेता शाहरुख खानची भेट घेतली. शाहरुख खान आणि सलमान खान हे दोघे आर्यन खानच्या अटकेपासून दोनवेळा भेटले आहेत. सलमान खानही काळवीट शिकार प्रकरण आणि अपघात प्रकरणात अडकला होता. त्यामुळे त्याला कोर्टाच्या अनेकदा वाऱ्या कराव्या लागल्या. अशात सलमान आणि शाहरुख यांच्यात काय चर्चा झाली ते समजू शकलेलं नाही. मात्र आर्यनची केस सतीश मानेशिंदे यांच्याकडे द्यावी असं सलमान खानने शाहरुखला सुचवल्याची चर्चा आहे. अभिनेता सुनील शेट्टीनेही आर्यन खानचं समर्थन केलं आहे. तसंच अभिनेता ऋतिक रोशन, सुझेन खान, रविना टंडन यांनीही आर्यनचं समर्थन केलं आहे.
जावेद अख्तर यांनीही घेतली आर्यनची बाजू
जावेद अख्तर म्हणाले, ‘एका पोर्टवर तुम्हाला एक बिलियन डॉलर किमतीचे कोकेन मिळते आणि दुसऱ्या ठिकाणी 1,200 लोक होते व तिथे 1,30,000 रुपये किमतीचा चरस-गांजा सापडला. 1,30,000 रुपयांचे ड्रग्ज राष्ट्रीय बातमी झाली. एक बिलियन डॉलर किंमत असलेल्या कोकेनबद्दलची हेडलाईन मी बघितलं नाही. त्याबद्दलची बातमी तर वर्तमानपत्राच्या 5व्या, 6व्या पानावर दिली जाते’, असं म्हणत जावेद अख्तर यांनी मार्मिक टोला लगावला.
मन्नतबाहेर चाहते
अभिनेता शाहरुख खान याने त्याच्या आगामी सिनेमाचं शुटिंग रद्द केलं आहे. तसंच आर्यनला अटक झाल्यानंतर त्याची कोणतीही प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. मात्र त्याच्या मन्नत या निवासस्थानाच्या बाहेर चाहते जमा होत असतात. शाहरुख खानला दुःखात सपोर्ट करण्यासाठी आम्ही आलो आहोत असं सांगतात. आता आजही आर्यनचा जामीन फेटाळण्यात आला आहे त्यामुळे या प्रकरणी पुढे काय होणार हा प्रश्न कायम आहेच.
कोण आहे आर्यन खान?
शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन हा याआधी फारसा कधी चर्चेतही नव्हता. तो नेहमीच स्वतःला लाइमलाईटपासून दूर ठेवत असल्याचं पाहायला मिळालं होतं. पण ड्रग्स प्रकरणात आर्यनला अटक झाल्यानंतर आता हाच आर्यन प्रचंड चर्चेत आला. इतर स्टार किड्सप्रमाणेच आर्यनचं विदेशात शिक्षण झालं आहे. धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर तो लंडनच्या सेव्हन ओक्समध्ये पुढील शिक्षणासाठी गेला होता. त्यानंतर साऊदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठात आर्यनने उच्चशिक्षण घेतलं. कॅलिफोर्नियातून त्याने सिनेमा निर्मितीचं प्रशिक्षण घेतलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT