आम्ही फोटो दाखवले तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही! आशिष शेलार यांचं मलिकांना प्रत्युत्तर
अमरावती दंगलीमागे भाजपचा हात असल्याचा आरोप आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. एवढंच नाही तर एक फोटो शेअर करत आशिष शेलार यांच्यासोबत रझा अकादमीचे लोक काय करत आहेत असा प्रश्नही विचारला आहे. भाजपने मुंबईहून दंगली घडवण्यासाठी पैसे पाठवले असाही आरोप आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या […]
ADVERTISEMENT
अमरावती दंगलीमागे भाजपचा हात असल्याचा आरोप आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. एवढंच नाही तर एक फोटो शेअर करत आशिष शेलार यांच्यासोबत रझा अकादमीचे लोक काय करत आहेत असा प्रश्नही विचारला आहे. भाजपने मुंबईहून दंगली घडवण्यासाठी पैसे पाठवले असाही आरोप आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या सगळ्या आरोपांना आशिष शेलार यांनी खास शब्दांमध्ये आणि त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
भाजपने पुकारलेल्या अमरावती शहर बंद दरम्यान मोठा हिंसाचार उफाळून आला होता. या घटनेप्रकरणी नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेतली. अमरावती बंद दरम्यान झालेला हिंसाचार हा भाजपचा सुनियोजित कट असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. भाजप नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांनी दंगलीचा कट रचल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. या सगळ्याला आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले आशिष शेलार?
हे वाचलं का?
नवाब मलिक यांना मी मराठीतली म्हण पूर्ण सांगत नाही पण तुमची खोड जात नाही हे मात्र खरं. अशा पद्धतीने वेगवेगळ्या फोटोंच्या जीवावर अफवांचं राजकारण करणं हा तुमचा धंदा आहे. त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात घडलेल्या दंगलीचा आणि 2016-17 मधल्या फोटोचा काय संबंध? असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला. एवढंच नाही तर तुमची ही खोड जात नसेल तर असे असंख्य फोटो रझा अकादमीसोबतचे आम्हाला दाखवावे लागतील. तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार ननाही. महाविकास आघाडीने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हे फोटोचं राजकारण बंद करावं असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
अमरावती दंगलीच्या आधी मुंबईतून भाजपच्या आमदाराने अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे पाठवले होते. त्याचीही चौकशी सुरू असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. अमरावतीमध्ये झालेली दंगल हा सुनियोजित कट होता आणि भाजपचे नेते, माजी मंत्री अनिल बोंडे हा कट रचला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला. अमरावती दंगलीचे पडसाद राज्यात इतर ठिकाणी उमटले नाही. त्यासाठी राज्यातील जनतेचे आभार मानत असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT