पवनराजेंची हत्या: निंबाळकर-पाटलांच्या राजकीय वैमनस्याचा रक्तरंजित इतिहास
उस्मानाबाद: खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) आणि आमदार राणा जगजितसिंग पाटील (Ranajagjitsinha Patil) यांच्यातल्या कलेक्टरसमोर झालेल्या तू-तू मैं-मैं मुळे उस्मानबादचे (Osmanabad) राजकारण पुन्हा एकदा तापायला सुरुवात झाली आहे. निंबाळकर आणि पाटील ही दोन्ही जिल्हातली मातब्बर घराणी. एकाच घराण्यातली ही दोन कुटुंब पण जिल्हाच्या राजकारणात त्यांच्यातून विस्तवही जात नाही. त्यांच्यातल्या वैर हे फक्त राजकारणातलं नाही तर […]
ADVERTISEMENT

उस्मानाबाद: खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) आणि आमदार राणा जगजितसिंग पाटील (Ranajagjitsinha Patil) यांच्यातल्या कलेक्टरसमोर झालेल्या तू-तू मैं-मैं मुळे उस्मानबादचे (Osmanabad) राजकारण पुन्हा एकदा तापायला सुरुवात झाली आहे. निंबाळकर आणि पाटील ही दोन्ही जिल्हातली मातब्बर घराणी. एकाच घराण्यातली ही दोन कुटुंब पण जिल्हाच्या राजकारणात त्यांच्यातून विस्तवही जात नाही. त्यांच्यातल्या वैर हे फक्त राजकारणातलं नाही तर या वैराला रक्तरंजित किनार आहे आणि याच राजकीय वैमनस्याचे पडसाद कलेक्टरसमोर दिसले. निंबाळकर आणि पाटील घराण्यातलं नेमकं वैर काय? काय आहे राजकीय वैमनस्याचा इतिहास जाणून घेऊया सविस्तरपणे. (assassination of pawanraj a bloody history of the nimbalkar patil political enmity osmanabad)
उस्मानाबादमधल्या निंबाळकर आणि पाटील घराण्याचे राजकीय वाद हे पुन्हा एकदा उफाळून आल्याचे दिसत आहे. दोन्ही घराणी जिल्हातली तालेवार घराणी. पण 2004 च्या निवडणुकांपासून त्यांच्यातल्या कुरघोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आणि त्याची परिणिती हा पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येत झाली.
पवनराजे निंबाळकर हे आत्ताचे खासदार असलेले ओमराजे निंबाळकर यांचे वडिल. तर डॉ. पद्मसिंहपाटील हे राणा जगजितसिंग यांचे वडील.
तारीख होती 3 जून 2006