रायगड : बाबासाहेब पुरंदरेंच्या अस्थी रायगडावर विसर्जित करण्याचा प्रयत्न?; नेमकं काय घडलं…

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

रायगड: किल्ले रायगडावर बुधवारी (9 डिसेंबर) एक अशी घटना घडली आहे की, ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या सगळ्या घटनेशी स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांचं नाव जोडलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायगडावरील शिव समाधीसमोर दोन युवकांकडून राख सदृष्य पावडर सापडल्याने वादा निर्माण झाला आहे. मराठा सेवक समितीच्या पुण्यातील कार्यकर्त्या पूजा झोळे यांनी ही घटना समोर आणली आहे.

ADVERTISEMENT

पुस्तक पूजनाच्या नावाखाली बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचं किल्ले रायगडावर विसर्जन केला जात असल्याचा आरोप संबंधित तरुणांवर करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

हे वाचलं का?

पुस्तक पूजनाच्या नावाखाली दोन तरुणांनी जेवणाच्या डब्यातून राख ही चंदन आणि अत्तरामध्ये भिजवून आणली होती. जी शिव समाधी लावण्यात येत असल्याचा आरोप पूजा झोळे यांनी केला आहे.

पूजा झोळे यांना दोन तरुण जे पुण्याचे असल्याचं सांगितलं जात आहे. ते राख सदृष्य वस्तू आणि पुस्तकाची पुजा करत असताना शिव समधी समोर आढळून आले. त्यावेळी पूजा झोळे यांनी त्यांना हटकलं. त्यानंतर याबाबत बराच वाद झाला.

ADVERTISEMENT

हा वाद सुरु असतानाच किल्ल्यावरील काही पोलीस कर्मचारी हे या ठिकाणी आले. अखेर पोलिसांनी तरुणांकडील संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेतला आणि केमिकल ॲनालिसेससाठी पाठवला आहे. तसेच महाड पोलीस सबंधित दोन तरुणांना चौकशीसाठी ताब्यातही घेतलं आहे.

ADVERTISEMENT

पूजा झोळे यांचं म्हणणं होतं की, या तरुणांकडे अत्तर हळद आणि चंदनाच्या पावडरमध्ये मिसळलेल्या अस्थी होत्या. या अस्थी बाबासाहेब पुरंदरे यांच्या होत्या असा आरोप मराठा सेवा समितीकडून करण्यात आला आहे.

या सगळ्याचा व्हीडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पूजा झोळे आणि त्याच्या सहकारी या जाब विचारत आहेत की, तुम्ही अस्थी शिव समाधीवर लावण्याचा प्रयत्न केला. पण दोन तरुण आपण चांगल्या कामसाठी आलो असल्याचं वारंवार सांगत आहेत.

मराठा सेवा समितीचा असा आरोप आहे की, ही हाडं बाबसाहेब पुरंदरे यांचीच आहेत. कारण झालं असं होतं की, बाबासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थीचं विसर्जन हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या किल्ल्यांवर करण्यात यावं अशी एक चर्चा होती. अशा बातम्या देखील त्यावेळी समोर आल्या होत्या. पण या वृत्ताला पुरंदरे कुटुंबीयांकडून दुजोरा देण्यात आला नव्हता.

दरम्यान, आज जो काही प्रकार रायगडावर घडला त्याविषयी पुरंदरे कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ती जाणून घ्या.

बाबासाहेब पुरंदरे यांचे ज्येष्ठ पुत्र अमृत पुरंदरे आणि प्रसाद पुरंदरे यांच्याशी मुंबई Tak च्या प्रतिनिधींनी जेव्हा संवाद साधला त्यावेळी त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घ्या.

रिपोर्टर: बाबासाहेबांच्या अस्थी आज रायगडावर नेण्यात आल्या का? 

अमृत पुरंदरे: मी तरी नाही पाठवल्या

रिपोर्टर: घरच्या व्यक्तींकडून पाठवण्यात आल्या का?

अमृत पुरंदरे: मला खरंच काही कल्पना नाही 

रिपोर्टर: घरच्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त कोणी करत नाही हे कार्य 

अमृत पुरंदरे: आम्ही अस्थिचं विसर्जन करुन आलेलो आहोत. आपल्या इथे आळंदीला आणि गोदावरीमध्ये अस्थी विसर्जन झालेलं आहे.

Babasaheb Purandare: तरुणांच्या मनावर राज्य करणारे बाबासाहेब पुरंदरे कोण होते?

दरम्यान, बाबासाहेबांचे कनिष्ठ पुत्र प्रसाद पुरंदरेंशी देखील याबाबत संवाद साधण्यात आला. पाहा ते नेमकं काय म्हणाले.

रिपोर्टर: बाबासाहेबांच्या अस्थी आज रायगडावर नेण्यात आल्या, अस दावा केला गेला.. हे खरं आहे का? 

प्रसाद पुरंदरे: नाही नाही.. मला काहीच माहीत नाही.. आम्ही आळंदीला गेलो होतो, आळंदीला आम्ही अस्थी विसर्जन केल्या आमच्यासाठी विषय संपला.

रिपोर्टर: ज्या अस्थी रायगडावर नेल्या, त्या बाबासाहेबांच्या अस्थी आहेत की नाही? 

प्रसाद पुरंदरे: मला काहीच माहीत नाही तर मी तुम्हाला काय सांगू. आम्ही तिथे अस्थी विसर्जन केलेलं नाही आणि आमचा ह्याच्याशी काही संबंध नाही.

असं म्हणत पुरंदरे कुटुंबीयांनी रायगडावर जो काही प्रकार झाला त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही असं स्पष्ट केलं आहे. मात्र, आता याप्रकरणी मराठा सेवा समिती नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT