धक्कादायक… साताऱ्यात 12 वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; आरडाओरड करताच नराधमाने मुलीला ट्रेनमधून फेकलं
सातारा: वास्को-निजामुद्दीन एक्सप्रेसमधून 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला चालत्या रेल्वेमधून बाहेर फेकण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. अतिप्रसंग करताना आरडाओरडा केला म्हणून एका नराधमाने तिला थेट रेल्वेतून बाहेर फेकल्याची खळबळजनक घटना आता समोर आली आहे. साताऱ्यातील लोणंद ते वाठार स्टेशनच्या दरम्यान रात्री 1 वाजता ही घटना घडली आहे. सकाळी जखमी अवस्थेत सापडलेल्या या मुलीला लोणंद […]
ADVERTISEMENT

सातारा: वास्को-निजामुद्दीन एक्सप्रेसमधून 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला चालत्या रेल्वेमधून बाहेर फेकण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. अतिप्रसंग करताना आरडाओरडा केला म्हणून एका नराधमाने तिला थेट रेल्वेतून बाहेर फेकल्याची खळबळजनक घटना आता समोर आली आहे. साताऱ्यातील लोणंद ते वाठार स्टेशनच्या दरम्यान रात्री 1 वाजता ही घटना घडली आहे.
सकाळी जखमी अवस्थेत सापडलेल्या या मुलीला लोणंद येथील ग्रामस्थांनी उपचारासाठी लोणंदच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे. लोणंद पोलीस आणि लोहमार्ग पोलिसांनी या मुलीचा पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जखमी अवस्थेत सापडलेल्या या मुलीचा लोहमार्ग पोलिसांनी जबाब घेतला असून या मुलीने आपल्या जबाबात ही घडलेली घटना सांगितली आहे. रेल्वेमध्ये अशा प्रकारे घटना घडल्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी वेगाने तपास करत हे दुष्कृत्य करणाऱ्या आरोपीला भुसावळमधून अटक केली आहे.
ठाणेजवळ लोकल ट्रेनमध्ये मोबाइल चोरासोबत झटापट, महिलेचा ट्रेनखाली येऊन दुर्देवी मृत्यू