Modi Cabinet: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी मोदींनी ‘या’ मंत्र्यांना दिला डच्चू!
नवी दिल्ली: केंद्रीय कॅबिनेटचा आज (7 जुलै) विस्तार होत आहे. पण या मंत्रिमंडळ विस्ताराआधी मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना मात्र डच्चू दिला गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. हर्षवर्धन, बाबुल सुप्रियो, रमेश पोखरियाल निशंक, सदानंद गौडा, देवोश्री चौधरी, संतोष गंगवार, संजय धोत्रे, रतनलाल कटारिया आणि प्रताप सारंगी यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलं असल्याचं समजतं आहे. याशिवाय थावरचंद गहलोत […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: केंद्रीय कॅबिनेटचा आज (7 जुलै) विस्तार होत आहे. पण या मंत्रिमंडळ विस्ताराआधी मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना मात्र डच्चू दिला गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. हर्षवर्धन, बाबुल सुप्रियो, रमेश पोखरियाल निशंक, सदानंद गौडा, देवोश्री चौधरी, संतोष गंगवार, संजय धोत्रे, रतनलाल कटारिया आणि प्रताप सारंगी यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलं असल्याचं समजतं आहे. याशिवाय थावरचंद गहलोत यांनी कालच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. जाणून घेऊयात या मंत्र्यांच्या राजीनाम्यामागील नेमकी कारणं काय आहेत.
थावरचंद गहलोत यांनी कालच आपल्या मंत्रिमपदाचा राजीनामा दिला आहे. थावरचंद गहलोत हे सामाजिक न्याय मंत्री होते. या व्यतिरिक्त, थावरचंद गहलोत हे राज्यसभेतील सभागृह नेते आणि भाजपच्या संसदीय मंडळाचे सदस्य देखील होते. पण आता त्यांची कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
थावरचंद गहलोत यांच्यानंतर ‘या’ मंत्र्यांकडून मागण्यात आला आहे राजीनामा
डॉ. हर्षवर्धन- केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी राजीनामा दिला असल्याचं समजतं आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेसंदर्भात मोदी सरकारवर ज्याप्रकारे प्रश्न उपस्थित केले जात होते ते पाहता आता डॉ. हर्षवर्धन यांना आपलं मंत्रिपद गमवावं लागलं आहे. हर्षवर्धन यांच्याकडे आरोग्य मंत्रालयासह विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची जबाबदारीही आहे. म्हणजे हर्षवर्धन यांच्या राजीनाम्यामुळे दोन मोठी मंत्रालये रिक्त झाली आहेत.