आता नाकातून मिळणार कोरोनाची लस, भारत बायोटेकच्या लसीच्या चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारत बायोटेकने BBV154 इंट्रानासल कोरोना लसीची फेज 3 चाचणी पूर्ण केली आहे. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने सांगितले की BBV154 सुरक्षित आणि इम्युनोजेनिक असल्याचे सिद्ध झाले आहे. आता लवकरच या लसीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. परवानगीसाठी डेटा सादर केला आहे. ही भारतातील पहिली अनुनासिक लस असेल. यामुळे कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईला अधिक बळ मिळेल.

ADVERTISEMENT

भारत बायोटेकेच अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला यांनी नुकतेच सांगितले की परवान्यासाठी लवकरच अर्ज केला जाईल आणि आम्हाला सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे. जर सर्व काही ठीक झाले तर या वर्षी ऑगस्टपर्यंत लोकांना ही कोरोना लस मिळेल. कोरोनाचे एखादे नवीन रूप आले तर त्याचा सामना करण्यास मदत होणार आहे. भारत बायोटेकचा विश्वास आहे की इंजेक्टेबल आणि नाकातील दोन्ही लसी भविष्यात जीव वाचविण्यात मदत करतील.

नाकातील लस संपूर्ण शरीराचे संरक्षण करते

सुमारे 4000 स्वयंसेवकांची या लसीची चाचणी घेण्यात आली आणि साइड इफेक्टचे एकही प्रकरण नोंदवले गेले नाही असे यापूर्वी सांगण्यात आले होते. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने यापूर्वी इंट्रानासल लसीच्या क्लिनिकल चाचण्यांना बूस्टर डोस म्हणून मान्यता दिली होती. एला म्हणाल्या की, कोणतीही इंजेक्टेबल लस शरीराच्या फक्त खालच्या भागाचे संरक्षण करते, तर नाकातील लस संपूर्ण शरीराला संरक्षण देते.

हे वाचलं का?

लस म्यूकोसल इम्यूनिटी प्रदान करेल?

AIIMS चे डॉ संजय राय यांनी याआधी सांगितले आहे की, अनुनासिक लस जर म्यूकोसल रोगप्रतिकार शक्ती प्रदान करणार असेल तर ती मानवजातीसाठी मोठी उपलब्धी असणार आहे. संसर्ग रोखण्यासाठी कोणतीही लस पूर्णपणे प्रभावी नाही. आम्हाला आशा आहे की ही लस पुढील संसर्ग टाळण्यासाठी म्यूकोसल इम्यूनिटी प्रदान करेल. देशात अजूनही लसीकरण सुरू आहे. आता लोकांना बूस्टर डोसही दिला जात आहे. त्यामुळे कोरोनावरही नियंत्रण आले आहे. कोविडच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे, तसेच मृत्यूदरही आटोक्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT