भास्कर जाधवांना लाज वाटली पाहिजे; नक्कल पाहून देवेंद्र फडणवीस भडकले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आज विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात भास्कर जाधव यांनी आज सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले. तसंच भाजपचे सगळे आमदारही आक्रमक झाले. भास्कर जाधव यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी फडणवीस यांच्यासह सगळ्याच आमदारांनी केली.

ADVERTISEMENT

भास्कर जाधव यांनी दोनवेळा उठून उभं राहात मी कोणताही असंसदीय शब्द वापरलेला नाही त्यामुळे मी माझे शब्द आणि अंगविक्षेप मागे घेतो असं सांगितलं. मात्र त्यांनी माफी मागितली नाही. ज्यामुळे विधानसभेत चांगलाच गदारोळ पाहण्यास मिळाला. देशाच्या सर्वोच्च नेत्याची नक्कल करणाऱ्या भास्कर जाधवांना लाज वाटली पाहिजे अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली. एवढंच नाही तर भास्कर जाधव माफी मागा या घोषणाही सभागृहात मोठ्या प्रमाणावर देण्यात आल्या.

यानंतर विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सभागृह दोन वाजेपर्यंत तहकूब केलं. आज भास्कर जाधव बोलायला उभे राहिले त्यावेळी देशाच्या पंतप्रधानांबाबत त्यांनी चुकीचं वक्तव्य केलं. ज्यानंतर चांगलाच गदारोळ सभागृहात झालेला बघायला मिळाला. उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही मोदींनी दिलेल्या 15 लाखांच्या आश्वासनाचं काय झालं असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सभागृहात असलेले भाजपचे आमदार चांगलेच आक्रमक झाले. भास्कर जाधव यांनी माफी मागितली पाहिजे अशी एकमुखी मागणी भाजपतर्फे करण्यात आली.

हे वाचलं का?

महाराष्ट्रातील परीक्षा घोटाळ्यांचे धागेदोरे मंत्रालयात, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

माफी मागा माफी मागा अशा घोषणा देण्यात आल्या. पंतप्रधानांचा अपमान करणाऱ्यांची माफी मागितलीच पाहिजे अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. देशाच्या पंतप्रधानांच्या संदर्भात चुकीचं वक्तव्य आणि अंगविक्षेप कधीही सहन केला जाणार नाही. यानंतर भास्कर जाधव पुन्हा सभागृहात उभे राहिले आणि म्हणाले काला धन लाना हैं की नहीं लाना हैं? अशी ती नक्कल होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल भास्कर जाधव यांनी केली. त्यानंतर भास्कर जाधव यांना लाज वाटली पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस जेव्हा सामनामध्ये आलेलं भाषण वाचत होते तेव्हा अध्यक्ष महोदयांनी आक्षेप घेतला होता. मुख्यमंत्र्यांबद्दल शब्द वापरलेले वाचून दाखवले तेव्हा अध्यक्ष महोदय म्हणाले होते की हा महाराष्ट्राचा अपमान होतो. मग पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल आणि अंगविक्षेप हा देशाचा अपमान नाही का? आम्हीही नकला करू शकतो पण आमच्यावर संस्कार आहेत. सभागृहात हे सगळं सहन करू नये आणि भास्कर जाधव यांनी माफी मागावी अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

भास्कर जाधव यांनी काय म्हटलं आहे?

सन्मानीय विरोधी पक्षनेत्यांचं आपण ऐकून घेतलं. अध्यक्ष महोदय आपण माझं पूर्ण ऐकून घ्या. लक्षवेधी सुरू होती. सुधीरभाऊ त्यावेळी काय काय बोललेत? त्याला मंत्रीमहोदय उत्तर देत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केली होती. त्यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी शब्दच्छल केला. 15 लाखांचं आश्वासन पंतप्रधान असताना ते बोलले नाहीत हे विरोधी पक्षनेत्यांना सांगायचं आहे. मी पण तेच केलं आहे. मी पंतप्रधान होण्यापूर्वीची आठवण करून दिली. त्यामुळे मी पण पंतप्रधानांची नक्कल केलेली नाही.

फडणवीस काय म्हणाले?

भास्कर जाधव जे बोलले त्यावर मी हक्कभंगच आणणार आहे. पण माझं ऑबजेक्शन हे पंतप्रधानांची नक्कल केली यावर आहे. आम्ही इतर नेत्यांच्या नकला करायच्या का? असाही प्रश्न फडणवीस यांनी विचारला. आपणही हे सहन नाही केलं पाहिजे असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT