मोदी-शाहांचा पुन्हा धक्का! भूपेंद्र पटेल होणार गुजरातचे मुख्यमंत्री
गांधीनगर: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांनी आपल्या मुख्यमंत्री (Chief Minister) पदाचा राजीनामा दिल्यानंतर गुजरातचा (Gujarat) पुढील मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री पदासाठी अनेकांची नावं चर्चेत होती. त्यात प्रामुख्याने केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, नेहमीप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि गृहमंत्री व भाजपचे […]
ADVERTISEMENT
गांधीनगर: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांनी आपल्या मुख्यमंत्री (Chief Minister) पदाचा राजीनामा दिल्यानंतर गुजरातचा (Gujarat) पुढील मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री पदासाठी अनेकांची नावं चर्चेत होती. त्यात प्रामुख्याने केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, नेहमीप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि गृहमंत्री व भाजपचे चाणक्य समजले जाणारे अमित शाह (Amit Shah) यांनी पुन्हा एकदा सगळ्याचे अंदाज चुकवत आपल्या धक्कातंत्राचा वापर करत एका अगदीच नव्या चेहऱ्याला मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिली आहे. यापुढे गुजरातचे मुख्यमंत्री हे भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) असणार आहेत.
ADVERTISEMENT
भूपेंद्र पटेल यांना गुजरातचं मुख्यमंत्री करण्यात आलं आहे. गुजरात भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासारखी नावं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असताना भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरत चर्चेत नसलेल्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली आहे.
विशेष म्हणजे जेव्हा केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर यंनी भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा केली तेव्हा भूपेंद्र पटेल हे स्टेजवर उपस्थित नव्हते, तर मागच्या रांगेत बसलेले होते. त्यामुळे स्वत: भूपेंद्र पटेल यांनाच नव्हे तर तेथील सर्व भाजप आमदारांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
हे वाचलं का?
BJP MLA Bhupendra Patel was seen showing a victory sign during the announcement of the new CM of Gujarat at the party office in Gandhinagar pic.twitter.com/GYAxoRwjjw
— ANI (@ANI) September 12, 2021
कोण आहेत भूपेंद्र पटेल?
-
भूपेंद्र पटेल हे पाटीदार समाजाचे असल्याने त्यांची समाजावर बरीच पकड आहे.
ADVERTISEMENT
2017 मध्ये गुजरातच्या घाटलोडिया जागेवरून ते पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेलेले आहेत. म्हणजे ही त्यांची पहिलीच टर्म आहे.
ADVERTISEMENT
2017 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या शशिकांत पटेल यांच्यावर 1 लाखांहून अधिक मताधिक्याने भूपेंद्र पटेल यांनी विजय मिळवला होता.
भूपेंद्र पटेल हे गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे निकटवर्तीय समजले जातात.
आनंदीबेन यांनी भूपेंद्र पटेल यांच्यासाठी घाटलोडीयाची जागाही सोडली होती.
आमदार होण्यापूर्वी भूपेंद्र पटेल हे अहमदाबाद महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणारी स्थायी समितीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
भूपेंद्र पटेल हे अहमदाबाद नागरी विकास प्राधिकरणाचेही अध्यक्ष होते.
भूपेंद्र पटेल यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं आहे.
Inside Story : अमित शाहांचा मध्यरात्री दौरा अन् दुपारी विजय रुपाणींनी दिला राजीनामा
दरम्यान, विजय रूपाणींनी 11 सप्टेंबरला गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. 2022 च्या डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. गुजरातमध्ये कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याने रुपाणी यांची गच्छंती झाली असल्याचं समजतं आहे. अशावेळी केंद्रीय नेतृत्वाने विजय रुपाणी यांना हटविण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे आता भाजपविरुद्ध असणारी गुजराती जनतेची नाराजी दूर करण्यात भूपेंद्र पटेल किती यशस्वी ठरतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT