मोठी बातमी: शिवसेनेला सलग दुसऱ्या दिवशी मोठा धक्का, अनिल परबांच्या मालमत्तामंवर ED चे छापे
मुंबई: राज्यात शिवसेनेच्या पुढाकाराने महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून प्रामुख्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते हे ईडीच्या रडारवर आले आहेत. याच सगळ्यात सलग दुसऱ्या दिवशी शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कारण काल (25 मे) शिवसेना नेते यशवंत जाधव यांना ईडीने फेमा अंतर्गत नोटीस बजावली होती. त्यानंतर आता शिवसेनेतील महत्त्वाचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल […]
ADVERTISEMENT

मुंबई: राज्यात शिवसेनेच्या पुढाकाराने महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून प्रामुख्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते हे ईडीच्या रडारवर आले आहेत. याच सगळ्यात सलग दुसऱ्या दिवशी शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कारण काल (25 मे) शिवसेना नेते यशवंत जाधव यांना ईडीने फेमा अंतर्गत नोटीस बजावली होती. त्यानंतर आता शिवसेनेतील महत्त्वाचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या ठिकाणी ईडीने छापेमारी सुरु केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दापोली रिसॉर्टप्रकरणी ईडीने ही कारवाई सुरु केली आहे. सध्या ईडीकडून मुंबई, पुणे, रत्नागिरी आणि दापोली याठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
अनिल परबांवर ईडीची नेमकी कारवाई का?
दापोली, पुणे आणि मुंबई या ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरु आहे. तसेच अनिल परब यांच्या जवळच्या लोकांची देखील चौकशी सुरु आहे. ईडीच्या वेगवेगळ्या टीम हे वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत आहेत.